शहरं
Join us  
Trending Stories
1
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
2
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
3
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...
4
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
5
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
6
चॉकलेटच्या डब्यात लपवून आणले तब्बल १६ साप अन्...; मुंबई विमानतळावर प्रवाशाला पोलिसांनी घेतले ताब्यात!
7
भारतात राहण्यासाठी काहीही! ५ बांगलादेशी पुरुषांनी निवडला 'विचित्र' मार्ग, कसे सापडले पोलिसांच्या तावडीत?
8
पतीसमोरच पत्नीने प्रियकरासोबत लग्न केले; निळ्या ड्रमची धडकीच मनात भरली, पतीने उलगडलं रहस्य
9
घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर... खरेदीची संधी गेली का? २४ कॅरेटचा आजचा भाव काय?
10
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
11
Vastu Tips: श्रीमंतांसारखं आयुष्य जगायचं असेल, तर आजच करा 'हे' सात प्रभावी वास्तू उपाय!
12
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...
13
रस्ते, मेट्रो, सिंचन, कुंभमेळा...सरकारने सादर केल्या 57 हजार 509 कोटींच्या पुरवणी मागण्या
14
'ChatGPT' ला हे प्रश्न विचारू नका, नाहीतर तुम्ही मोठ्या अडचणीत सापडू शकता
15
प्रेमात मिळाला धोका तेव्हा खासगी आयुष्यातील 'तो' व्हिडिओ केला लीक; क्रिकेटर अडकला होता वादात
16
अदानी ग्रीन एनर्जीचा ऐतिहासिक विक्रम! अक्षय ऊर्जा क्षेत्रात असं काम करणारी पहिलीच भारतीय कंपनी
17
सौरभ गोखले आणि अनुजा साठेला नकोय मूल, अभिनेत्री म्हणाली- "आम्हाला प्राणी जास्त आवडतात..."
18
मर्यादेपेक्षाही अधिक महाग होणार चांदी; रॉबर्ड कियोसाकी यांच्या दाव्यात किती तथ्य?
19
"मराठी बोला तुम्ही मराठी बोला...", मुंबईच्या लोकलमध्ये तरुणाईचा गजर, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल!
20
श्वेता तिवारीला एक्स पतीने कारमध्ये एका व्यक्तीसोबत पकडलं होतं रंगेहाथ, राजा चौधरीचा खुलासा

त्याच्या नजरेला स्वप्नांचा प्रकाश

By admin | Updated: June 4, 2014 01:50 IST

त्याच्या नजरेला स्वप्नांचा प्रकाश

 

नाशिक : ‘‘नियतीने आयुष्यात अंधार केला, तर परिस्थितीने तो अधिक गडद केला. डोक्यावरील छप्परही हरपलेले. रोजच्या दिवसाची भ्रांत आणि जगण्याचीही धडपड होतीच. दोष द्यायचा तरी कुणाला? आयुष्यात असे अनेक दिवस अनुभवत आणि जगत आलो आहे. कष्ट करणारी माझी आई आणि माझ्यासाठी प्रार्थना करणार्‍या बहिणीच्या स्वप्नांसाठी मी सुखाचे सुख स्वप्न पाहत आहे.’’ - करण जगदिश शर्मा असे या अंध विद्यार्थ्याचे नाव. त्याची ही प्रतिक्रिया. पंचवटीत राहणारा करण हा नाशिकरोडच्या के. जे. मेहता शाळेतील अंध युनिटमध्ये शिक्षण घेत आहे. इयत्ता बारावीत यश मिळाल्याने स्वप्नाच्या अधिक जवळ गेल्याचा आनंद असल्याचे करणने सांगितले. करण शर्मा हा जन्मजात अंध विद्यार्थी. घरची परिस्थिी बेताचीच. आई एका साडीच्या दुकानात कामाला, तर वडील स्वीटच्या दुकानात कारागीर म्हणून काम करीत होते. घरची परिस्थिती बेताचीच. अशा परिस्थितीतही आई-वडिलांनी शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. मुलगा शिकत असताना पाहण्याचे आयुष्य मात्र करणच्या वडिलांना लाभले नाही. त्यांचा अकाली मृत्यू झाला. काळाने आणखी क्रूर थट्टा केली. घरी आई, लहान बहीण. आईची जिद्द आणि बहिणीची माया यांनी घरचे ओझे कधीही लादले नाही. त्यामुळे करणच्या शिक्षणाचा गाडा सुरूच आहे. करण आता बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. त्याला ६९.५३ टक्के गुण मिळाले आहेत. बारावीनंतर डीएड करून विशेष मुलांचे शिक्षक होण्याचे करणचे स्वप्न आहे. हे स्वप्न साकार होण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकल्याचा आनंद असल्याचे करण सांगतो. करणला शिक्षक व्हायचे आहे. (प्रतिनिधी)