नाशकात पुन्हा ‘लाईट, कॅमेरा, ॲक्शन’ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:14 AM2021-07-25T04:14:14+5:302021-07-25T04:14:14+5:30

नाशिक : सर्व शासकीय नियम, अटी व शर्तींचे पालन करून चित्रीकरणासाठीही परवनागी देण्यात यावी, अशा सूचना राज्याचे ...

'Light, camera, action' again in Nashik! | नाशकात पुन्हा ‘लाईट, कॅमेरा, ॲक्शन’ !

नाशकात पुन्हा ‘लाईट, कॅमेरा, ॲक्शन’ !

Next

नाशिक : सर्व शासकीय नियम, अटी व शर्तींचे पालन करून चित्रीकरणासाठीही परवनागी देण्यात यावी, अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील परिघात पुन्हा एकदा मालिका आणि चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी ‘लाईट, कॅमेरा, ॲक्शन’चा आवाज घुमणार असल्याने निदान चित्रपट, मालिका कलाकार आणि त्यासाठी तांत्रिक कामे करणाऱ्या तंत्रज्ञांना तरी काहीसा दिलासा मिळू शकणार आहे.

जिल्ह्यात पर्यटनाच्या माध्यमातून अर्थचक्राला चालना देण्यासह चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करणाऱ्या कलाकार आणि तंत्रज्ञांना त्यातून अर्थार्जनाचा मार्ग उपलब्ध होऊ शकणार आहे. नाशिक जिल्हा हा मुंबई व पुणे यांच्या लगतचा जिल्हा असल्याने इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, नाशिक तसेच जिल्ह्यातील अन्य तालुक्यांच्या निसर्गरम्य परिसरात चित्रीकरणास चित्रपट आणि मालिका निर्मात्यांचा कल वाढला आहे. त्यामुळेच त्यांच्या चित्रीकरणासाठी परवानगी देण्यात आली आहे.

इन्फो

पहिल्या लाटेनंतर गतवर्षी जून महिन्यात परवानगी

मुंबई-पुण्यात कोरोनाचा उद्रेक वाढल्यानंतर गतवर्षी अनेक चित्रपट, मालिकांचे चित्रीकरण रद्द झाले होते. त्याचा फटका निर्मात्यांना मोठ्या प्रमाणात बसला होता. त्या पार्श्वभूमीवर नाशिकला चित्रीकरण सुरू करण्यास परवानगी मिळावी यासाठी गतवर्षीदेखील नाशिकच्या चित्रपटकर्मींना शासन प्रशासनाकडे निवेदने देऊन प्रयास करावे लागले होते. नाशिकच्या परिघात उत्तम लोकेशन्स असून कलाकारही हरहुन्नरी आहेत. त्यामुळे गतवर्षीदेखील नाशिकमध्ये चित्रीकरण सुरू व्हावे यासाठी या अगोदरही अनेक संस्था विविध पातळ्यांवर प्रयास करावे लागले होते. गतवर्षी जून महिन्यात प्रशासनाकडून जिल्ह्यातील चित्रीकरणास परवानगी मिळाली होती. त्यानंतर नाशिक जिल्ह्यात अनेक मालिकांचे काही भाग आणि काही चित्रपटांचे चित्रीकरण झाले होते. मात्र, दुसऱ्या लाटेनंतर मार्चपासून ही परवानगी काढून घेण्यात आली होती.

इन्फो

अल्पसा दिलासा

कोरोनाच्या पहिल्या तसेच दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मुंबई-पुण्यातील चित्रीकरण बंद झाले. त्यामुळे निर्मात्यांनी गुंतवलेला पैसा अडकल्याने त्यांची आर्थिक कोंडी झाली होती. तसेच कलाकार, तंत्रज्ञांनाही काम नसल्याने त्यांचीही मोठी आर्थिक कोंडी झाली होती. गुंतलेला पैसा परत मिळवायचा असेल, तर चित्रपट आणि मालिकांचे चित्रीकरण ताबडतोब करणे गरजेचे बनले होते. त्यात नाशिकला पालकमंत्र्यांनी परवानगी दिल्याने या क्षेत्राला थोडाफार तरी दिलासा मिळू शकणार आहे. चित्रीकरणादरम्यान संबंधितांना सुरक्षित वावराचे सर्व नियम पाळावे लागणार आहेत. त्यासाठी गतवर्षी आखून देण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करावे लागणार आहे.

---------------------

कामाची चिंता मिटेल

चित्रपट आणि मालिका कलाकार आणि तंत्रज्ञांना पुन्हा काम मिळू शकणार आहे. त्यामुळे निदान काही प्रमाणात तरी दिलासा मिळाला, असेच म्हणावे लागेल. तसेच कलाकारांच्या कलेला जिल्ह्यातच वाव मिळण्याचे समाधान लाभणार असून जिल्ह्यात चित्रपट, मालिका निर्मितीला अधिक चालना मिळू शकणार आहे.

श्याम लोंढे, उत्तर महाराष्ट्र समितीप्रमुख, मराठी चित्रपट महामंडळ

---------------------

पान दोनसाठी मेन (गुड मॉर्निंग पानासाठी)

Web Title: 'Light, camera, action' again in Nashik!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.