घरफोडीत सोन्याचे दागिने लंपास

By Admin | Updated: August 18, 2016 01:02 IST2016-08-18T01:00:15+5:302016-08-18T01:02:17+5:30

घरफोडीत सोन्याचे दागिने लंपास

Lifting the burglar gold jewelry | घरफोडीत सोन्याचे दागिने लंपास

घरफोडीत सोन्याचे दागिने लंपास

नाशिक : सातपूर औद्योगिक वसाहतीत घरफोडीच्या घटना सुरूच असून, समतानगरमध्ये झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सोने-चांदीच्या दागिन्यांसह रोकड चोरून नेल्याची घटना रविवारी (दि़१४) घडली़
सातपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगेश कैलास सोनवणे (३३, रा. बरदेश्वर गणपती मंदिर, एमएचबी कॉलनी, समतानगर) हे रविवारी कुटुंबीयांसह बाहेरगावी गेले होते़ ही संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडी-कोयंडा तोडून लोखंडी कपाटात ठेवलेले सोने-चांदीचे दागिने व २० हजार रुपये रोख असा सुमारे ४५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.
याप्रकरणी सोनवणे यांच्या फिर्यादीवरून सातपूर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Lifting the burglar gold jewelry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.