घरफोडीत सोन्याचे दागिने लंपास
By Admin | Updated: December 22, 2015 23:43 IST2015-12-22T23:42:43+5:302015-12-22T23:43:40+5:30
घरफोडीत सोन्याचे दागिने लंपास

घरफोडीत सोन्याचे दागिने लंपास
नाशिक : बोरगड परिसरातील एकतानगरमध्ये झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यांसह गृहोपयोगी साहित्य चोरून नेल्याची घटना घडली आहे़
एकतानगरमधील जयप्रकाश कृष्ण डुगल हे १९ ते २१ डिसेंबर दरम्यान बाहेर गेले होते़ या दरम्यान त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला़ घरातील लोखंडी कपाटात ठेवलेले दोन ग्रॅम सोन्याचे दागिने, रोख रक्कम, टीव्ही, गॅस सिलिंडर असा मुद्देमाल चोरून नेला़ या प्रकरणी डुगल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला
आहे़ (प्रतिनिधी)