मालेगाव : गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार व जलयुक्त शिवार योजनेची तालुक्यातील १२५ गावांमध्ये कामे सुरू आहेत. २३ लाख रुपयांच्या इंधन खर्चातून १०८ लाख रुपयांची कामे मार्गी लागली आहेत. एक लाख ७४ हजार २३४ घनमीटर गाळ आतापर्यंत काढण्यात आला असून, १७ कोटी ४२ लाख ३४ हजार लिटर पाणीसाठ्यात वाढ होणार असल्याची माहिती प्रांत अधिकारी अजय मोरे यांनी दिली.तालुक्याला कायमच दुष्काळाच्या झळा बसतात. उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. धरणांमधील गाळांमुळे पुरेसा पाणीसाठा होत नाही. या पार्श्वभूमीवर येथील प्रशासनाने प्रांत अधिकारी मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आराखडा तयार केला होता. या आराखड्यानुसार या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात आहे.तालुक्यातील १२५ गावांमध्ये गेल्या जानेवारीपासून या योजनेंतर्गत कामे सुरू आहेत. ३० जूनपर्यंत कामे केली जाणार आहेत. आतापर्यंत एक लाख ७४ हजार २३४ घनमीटर गाळ लोकसहभागातून काढण्यात आला आहे. ७ हजार ६३३ हेक्टर क्षेत्रावर काढण्यात आलेला गाळ टाकण्यात आला आहे. यासाठी २३ लाख रुपये इंधन खर्च आला आहे.
पावणेदोन लाख घनमीटर गाळाचा उपसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 00:36 IST
मालेगाव : गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार व जलयुक्त शिवार योजनेची तालुक्यातील १२५ गावांमध्ये कामे सुरू आहेत. २३ लाख रुपयांच्या इंधन खर्चातून १०८ लाख रुपयांची कामे मार्गी लागली आहेत. एक लाख ७४ हजार २३४ घनमीटर गाळ आतापर्यंत काढण्यात आला असून, १७ कोटी ४२ लाख ३४ हजार लिटर पाणीसाठ्यात वाढ होणार असल्याची माहिती प्रांत अधिकारी अजय मोरे यांनी दिली.
पावणेदोन लाख घनमीटर गाळाचा उपसा
ठळक मुद्दे एक लाख ७४ हजार २३४ घनमीटर गाळ आतापर्यंत काढण्यात आलाआराखड्यानुसार या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी केली