विवाह समारंभातून १५ तोळे सोन्याचे दागिने लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2016 00:24 IST2016-01-04T00:21:50+5:302016-01-04T00:24:10+5:30
विवाह समारंभातून १५ तोळे सोन्याचे दागिने लंपास

विवाह समारंभातून १५ तोळे सोन्याचे दागिने लंपास
नाशिक : कन्यादानाचा प्रसंग मोबाइल कॅमेऱ्यात टिपण्यात मश्गूल असलेल्या वधूच्या बहिणीची पर्स दोन अल्पवयीन चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना पंचवटीतील राका ग्रीन स्क्वेअरमध्ये रविवारी (दि़३) दुपारच्या सुमारास घडली आहे़ या पर्समध्ये वधूचे १५ तोळे सोन्याचे दागिने होते़ दरम्यान, या प्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
अभय प्रमोद गुंजाळ यांच्या भावाचे रविवारी लग्न होते़ विवाहविधी सुरू असताना कन्यादानाच्या वेळी वधूसाठी आणलेले दागिने तिच्या बहिणीकडे ठेवले होते़ दुपारी एक वाजेच्या सुमारास कन्यादानाचा प्रसंग कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी वधूच्या बहिणीने दागिने ठेवलेली पर्स खाली ठेवली व फोटो काढण्यात दंग झाली़ याचा फायदा घेत चोरट्यांनी दागिन्याची पर्स लंपास केली़ थोड्या वेळाने ही बाब समजताच वधू आणि वर पक्षामध्ये खळबळ उडाली़ पोलिसांनी मंगल कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर दोन अल्पवयीन संशयित ही पर्स घेऊन जाताना दिसून आले़