लायन्स सुप्रीमचा पदग्रहण सोहळा

By Admin | Updated: July 24, 2014 01:03 IST2014-07-24T00:16:14+5:302014-07-24T01:03:10+5:30

नूतन अध्यक्षपदी श्याम केदार

The Lifetime Achievement Ceremony | लायन्स सुप्रीमचा पदग्रहण सोहळा

लायन्स सुप्रीमचा पदग्रहण सोहळा

नाशिक : लायन्स क्लब आॅफ नाशिक सुप्रीमचा पदग्रहण सोहळा नुकताच झाला. यावेळी नूतन अध्यक्ष श्याम केदार यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पदाची शपथ घेतली.
पदग्रहण सोहळ्यात सेक्रेटरी आर. डी. पगार, खजिनदार प्रभाकर निर्मल यांनीही पदाची शपथ घेतली. नूतन अध्यक्ष श्याम केदार यांनी पदग्रहण सोहळ्यातच तीन नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले. जन्मजात अंध असलेल्या डॉ. नितीन शिंपी यांच्या संस्थेस प्रोत्साहनपर दहा हजार रुपयांची मदत देण्यात आली.
त्याचबरोबर दुर्गम भागात राहत रोजंदारी करता-करता दहावी परीक्षेत ७६ टक्के गुण मिळविणाऱ्या माधुरी दत्तू मते या मुलीस शिक्षणासाठी दहा हजार रुपयांची मदत करण्यात आली. श्याम केदार यांनी या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली.
कुटुंबातील ६५ टक्के भाजलेल्या सहा वर्षाच्या मुलीस औषधोपचारासाठी पाच हजार रुपयांची मदत देण्यात आली. चिमुरडीवर उपचार करणाऱ्या डॉ. नेहते यांच्या प्रतिनिधीकडे धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी लायन्स क्लब आॅफ नाशिक सुप्रीमचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: The Lifetime Achievement Ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.