तपमान वाढल्याने जनजीवन विस्कळीत
By Admin | Updated: February 28, 2017 23:59 IST2017-02-28T23:59:29+5:302017-02-28T23:59:47+5:30
खामखेडा : परिसरामध्ये गेल्या आठवड्यापासून तपमानात वाढ झाल्याने दुपारच्या वेळेस घरातून बाहेर पडणे मुस्कील झाले आहे. दुपारी रस्ते ओस पडत असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे.

तपमान वाढल्याने जनजीवन विस्कळीत
खामखेडा : परिसरामध्ये गेल्या आठवड्यापासून तपमानात वाढ झाल्याने दुपारच्या वेळेस घरातून बाहेर पडणे मुस्कील झाले आहे. दुपारी रस्ते ओस पडत असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. कडक उन्हामुळे गेल्या आठ दिवसांपासून शेतकाम करणारे मजूर व शेतकरी यांच्याही कामाच्या वेळापत्रकात बदल झाला आहे. शेतकरी सकाळी लवकर शेतात जाऊन पिकाना पाणी देणे तसेच मशागतीची कामे करून ११ वाजेनंतर घरी परतत असून, दुपारनंतर ४ वाजच्या दरम्यान पुन्हा शेतकामे करत आहेत. पशुपालकही सकाळी आपली गुरे, मेंढ्या, बकऱ्या आदि जनावरे चरण्यासाठी सकाळी लवकर डोंगरात नेऊन दुपारच्या वेळेस आपली जनावरे झाडाच्या सावली खाली असल्याचे चित्र सर्वत्र पाहावयास मिळत आहे. उन्हाळ्याची चाहूल लागल्याने रसवंती, शीतपेय दुकाने सजू लागली आहेत. उन्हामुळे नागरिक हैराण होऊन दुपारच्या वेळेस घरातून बाहेर पडणार नागरिक डोक्यात टोपी अथवा डोक्याला उपरणे बांधून व डोळ्यावर गॉगल लावून रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. काही महिला तर डोक्याला रु माल किंवा स्कार्प बांधून बाहेर पडतात. आठवड्यातून काही दिवस दिवसा तर काही दिवस रात्री वीजपुरवठा नसतो. तेव्हा या वेळेस पंखे बंद असतात. घरासमोरील पडवित किंवा एखाद्या झाडाखाली बसावे लागते. या प्रचंड उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. शेतकरी, शेतमजूर, पशुपालक याचे वेळापत्रक बदलले आहे. (वार्ताहर)