शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

जीवघेणा प्रवास : वाहनधारकांची दररोज तारेवरची कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2020 4:42 PM

नांदूरशिंगोटे : सिन्नर व संगमनेर तालुक्याला जोडणाऱ्या नांदूरशिंगोटे - निमोण रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डेच खड्डे झाल्याने रस्त्याची दुरावस्था झाली आहे. पावसाने रस्त्यात खड्डा की खड्यात रस्ता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दरवर्षी या रस्त्याची लाखो रुपये खर्च करून मलमपट्टी केली जाते परंतु रस्त्याची अवस्था जैसे-थे असल्याने परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देनांदूरशिंगोटे - निमोण रस्त्यावर खड्डेच खड्डे

नांदूरशिंगोटे : सिन्नर व संगमनेर तालुक्याला जोडणाऱ्या नांदूरशिंगोटे - निमोण रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डेच खड्डे झाल्याने रस्त्याची दुरावस्था झाली आहे. पावसाने रस्त्यात खड्डा की खड्यात रस्ता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दरवर्षी या रस्त्याची लाखो रुपये खर्च करून मलमपट्टी केली जाते परंतु रस्त्याची अवस्था जैसे-थे असल्याने परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.नांदूरशिंगोटे - निमोण रस्ता नाशिक व अहमदनगर जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असून चार ते पाच तालुक्यांना जोडणारा महत्त्वाचा रस्ता आहे. निमोण रस्त्याने मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वर्दळ असल्याने दरवर्षी पावसाळ्यात सदर रस्त्याची दुरावस्था होत आहे. शिर्डी, शनिशिंगणापूर, मोहटादेवी, मढी, भगवानगड आदी तिर्थक्षेत्र असणाऱ्या ठिकाणी याच रस्त्याचा वापर केला जातो. मालवाहतूकीचे प्रमाण जास्त असल्याने रस्ता नेहमीच खराब होत आहे. या मार्गाने प्रवास करताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. रस्त्यावरील खड्यात पावसाचे पाणी साचल्यामुळे वाहन चालकांना अंदाज येत नाही. त्यामुळे अनेक वेळा छोटे मोठे अपघात होत आहेत. तसेच अनेक ठिकाणी रस्त्याचे डांबरीकरण उखडल्याने रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर सर्वत्र चिखलाचे साम्राज्य झाल्याने चिखलातूनच वाहनधारकांना वाट काढावी लागते. नांदूरशिंगोटे ते निमोण हा सात किलोमीटरचा रस्ता असून अडीच किलोमीटर पर्यंत जिल्हा हद्द आहे. परिसरातील गावांना जोडणारा मुख्य रस्ता असल्याने वाहन धारकांना खड्यांमध्ये रस्ता शोधावा लागत आहे. नांदूरशिंगोटे गावातील दहा टक्के नागरिक निमोण रोड लगत वस्तीवर वास्तव करत असल्याने त्यांना गावात दळणवळणासाठी हाच एकमेव रस्ता असल्याने लवकरात लवकर रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी होत आहे.चौकट : नांदूरशिंगोटे-लोणी-कोल्हापूर हा रस्तादळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. जिल्हा हद्दीपर्यंत रस्त्यावर जागोजाग खडे पडल्याचने वाहनांचे नुकसान होत आहे. रात्रीच्यावेळी अंधारात खड़े वाचविताना दुचाकीस्वारांचे दररोज छोटे-मोठे अपघात होतआहे. लोणी रस्त्याने अवजड वाहनांची वाहतूक वाढल्याने रस्त्यावरील खड्डे त्रासदायक ठरू लागले आहे. त्यामुळे दररोजची डोकेदुखी ठरत असल्याने रस्त्यांवरील खड्डे दुरुस्तीचे काम तातडीने करण्यात यावे.अरुण शेळके, संचालक, लोकशिक्षण मंडळ, नांदूरशिंगोटे. 

 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाpwdसार्वजनिक बांधकाम विभाग