शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
3
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
4
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
5
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
6
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
7
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
8
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
9
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
10
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
11
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
12
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
15
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
16
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
17
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
18
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
19
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
20
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...

बारा वर्षीय मुलीचा खुन करणाऱ्यास जन्मठेपेची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 18:14 IST

लासलगाव : चांदवड तालुक्यातील नारायणगांव शिवारात घरात घुसुन कुºहाडीचे घाव घालत बारा वर्षीय मुलीचा खुन केल्याप्रकरणी संतोष गोविंद पवार यास निफाडचे जिल्हा व सत्र न्यायाधीश पीठ. डी. दिग्रसकर यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

ठळक मुद्देसंतोष उर्फ वाल्मिक गोविंद पवार याच्या विरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला होता.

लासलगाव : चांदवड तालुक्यातील नारायणगांव शिवारात घरात घुसुन कुºहाडीचे घाव घालत बारा वर्षीय मुलीचा खुन केल्याप्रकरणी संतोष गोविंद पवार यास निफाडचे जिल्हा व सत्र न्यायाधीश पीठ. डी. दिग्रसकर यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.नारायणगांव शिवारात बाबाजी शंकर गांगुर्डे यांचे घरात दि. १५ आक्टोबर २०१७ रोजी सायंकाळच्या सुमारास मनिषा बाबाजी गांगुर्डे (१२), वैशाली बाबाजी गांगुर्डे (१०), समाधान बाबाजी गांगुर्डे (९) हे घरात आईवडील नसतांना अभ्यास करत होते.त्यावेळी संतोष ऊर्फ वाल्मिक गोविंद पवार (३७) हा हातात कुºहाड घेऊन आला व त्याने घरातील दरवाजे बंद करु न मुलांच्या डोक्यावर, कपाळावर कुºहाडीने घाव घातले.या हल्यात मुलगी मनिषा उपचारादरम्यान मयत झाली होती, तर मुलगा समाधान व मुलगी वैशाली गंभीर जखमी झाले होते. याबाबत मुलांचे वडील बाबाजी गांगुर्डे यांनी वडनेरभैरव पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार संतोष उर्फ वाल्मिक गोविंद पवार याच्या विरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला होता.सदर गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरिक्षक ए. ओ. पाटील यांनी आरोपपत्र निफाडचे जिल्हा सत्र न्यायालयात पाठविले. सदर खटल्यात तपास अधिकारी, जखमी मुलीसह एकुण दहा साक्षीदारांची साक्ष सहाय्यक जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड रमेश कापसे यांनी नोंदविली.न्यायालयासमोर आलेल्या पुराव्यावरुन निफाडचे जिल्हा व सत्र न्यायाधीश पीठ. डी. दिग्रसकर यांनी संतोष उर्फ वाल्मिक गोविंद पवार यास भादवि कलम ३०२ अन्वये जन्मठेप व दहा हजार रु पये दंड, दंड न भरल्यास एक वर्ष सश्रम कारावास कलम ३०७ अन्वये दहा वर्षे सश्रम कारावास व पाच हजार रु पये दंड ,दंड न भरल्यास सहा महिने सश्रम कारावास, कलम ४५२ अन्वये पाच वर्षे सश्रम कारावास व पाच हजार रु पये दंड, दंड न भरल्या सहा महिने सश्रम कारावास, कलम ३४२ अन्वये एक वर्षे सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली आहे. 

टॅग्स :MurderखूनCrime Newsगुन्हेगारी