अल्पवयीन मुलगी अत्याचार प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा
By Admin | Updated: September 30, 2015 23:55 IST2015-09-30T23:54:29+5:302015-09-30T23:55:03+5:30
अल्पवयीन मुलगी अत्याचार प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा

अल्पवयीन मुलगी अत्याचार प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा
नाशिक : अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करणारा आरोपी दीपक बाबासाहेब गायकवाड यास जिल्हा व सत्र न्यायाधीश ऊर्मिला फलके-जोशी यांनी बुधवारी (दि़३०) जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे़
या खटल्याबाबत अधिक माहिती अशी की, अंबड परिसरात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीचे आरोपी गायकवाड याने २०१३ मध्ये अपहरण करून अत्याचार केले होते़ अंबड पोलीस ठाण्यात या प्रकरणी अपहरण, अत्याचार तसेच लहान बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये गायकवाडवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती़
या खटल्यात सरकारी वकील अॅड़ सुप्रिया गोरे यांनी न्यायालयात भक्कम पुरावे सादर केले़ त्यानुसार न्यायाधीशांनी आरोपी गायकवाड यास जन्मठेप व दहा हजार रुपये दंड, दंड न भरल्यास आणखी दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे़ (प्रतिनिधी)