लेवा पाटीदार उत्कर्ष मंडळ स्नेहमेळावा

By Admin | Updated: December 18, 2015 00:33 IST2015-12-18T00:31:38+5:302015-12-18T00:33:04+5:30

लेवा पाटीदार उत्कर्ष मंडळ स्नेहमेळावा

Leva Patidar Utkaryesh Mandal is a partner | लेवा पाटीदार उत्कर्ष मंडळ स्नेहमेळावा

लेवा पाटीदार उत्कर्ष मंडळ स्नेहमेळावा

नाशिक : तोताराम महाराज लेवा पाटीदार उत्कर्ष मित्रमंडळातर्फे स्वामी समर्थ मंगल कार्यालयात स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी समाजबांधवांची माहिती असलेल्या परिचय पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
या कार्यक्रमात समाजबांधव सूची २0१५, वधूवर परिचय, विद्यार्थी गुणगौरव आदि कार्यक्रम झाले. शरद खडसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात राजेश नेहेते, दिनेश भंगाळे, किसन वराडे, डॉ. कैलास कोलते यांनी मनोगत व्यक्त केले.
व्यासपीठावर विकास नेहेते, विठ्ठल लोखंडे, डॉ. प्रकाश ढाके, चंद्रकांत चोपडे, जगदीश किनगे, शिरीष भंगाळे, योगेश कोलते आदि उपस्थित होते. तसेच बाहेरगावाहून आलेल्या मान्यवरांचाही सत्कार करण्यात आला. तोताराम महाराज महिला मंडळाच्या फलकाचे अनावरण करण्यात आले.
कार्यक्रमास सतीश नेमाडे, दत्तात्रय राणे, ललित पाटील, अजय बऱ्हाटे, रघुनाथ रोटे, मधुकर
वराडे, वासुदेव पाटील, सुरेश लोखंडे, नरेंद्र जंगले, दिनेश पाटील आदि उपस्थित होते. सूत्रसंचालन धर्मराज देवकर व धीरज पाटील यांनी
केले. लालजी पाटील यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)

Web Title: Leva Patidar Utkaryesh Mandal is a partner