वर्गशिक्षकाने लिहिली विद्यार्थिनीला प्रेमपत्रे
By Admin | Updated: October 10, 2015 00:01 IST2015-10-10T00:00:32+5:302015-10-10T00:01:19+5:30
रचना विद्यालयातील प्रकार : संबंधित शिक्षकाची तडकाफडकी बदली; पालक असमाधानी

वर्गशिक्षकाने लिहिली विद्यार्थिनीला प्रेमपत्रे
नाशिक : रचना विद्यालयातील नववीच्या विद्यार्थिनीला तिच्या वर्गशिक्षकाने प्रेमपत्र लिहिल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी शाळा प्रशासनाला धारेवर धरल्यानंतर संबंधित शिक्षकाची तडकाफडकी बदली करण्यात आली.
प्रशासनाच्या या कारवाईविषयी मात्र पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. शिक्षकाने आपल्या विद्यार्थिनीलाच प्रेमपत्र लिहिल्याच्या घटनेमुळे शहराच्या शैक्षणिक वर्तुळाला चांगलाच धक्का बसला आहे. पीडित मुलीने आपल्या पालकांकडे या प्रकरणाची वाच्यता केल्यानंतर पालकांनी शाळा प्रशासनाला जाब विचारला. यावेळी मोठा जमाव जमल्याने पोलिसांनी शाळेत धाव घेऊन संबंधित शिक्षकाला ताब्यात घेतले. प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले मात्र सामंजस्याने ते मिटविण्यात आले.
पालकांनी पोलीस आणि प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार शरणपूररोड येथील रचना विद्यालयातील राजेंद्र सोननीस या ४५ वर्षीय वर्गशिक्षकाने नववीच्या एका विद्यार्थिनीला पंधरवड्यापूर्वी व गेल्या सोमवारी अशी दोन पत्रे लिहिली.