टाकळी, पंचशीलनगरला पत्रे उडाले

By Admin | Updated: May 28, 2014 01:41 IST2014-05-27T23:40:32+5:302014-05-28T01:41:27+5:30

टाकळी : वादळीवार्‍यासह झालेल्या जोरदार पावसामुळे टाकळीसह पंचशीलनगर, राहुलनगर तसेच समतानगर येथील झोपडप˜ीतील घरांचे पत्रे उडाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले. घरातील साहित्याचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. परिसरात ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली, तर जोरदार पावसामुळे रस्त्यांवर ठिकठिकाणी झाडांच्या फांद्या पडल्याचे चित्र होते.

Letters to Takali, Panchsheel were shattered | टाकळी, पंचशीलनगरला पत्रे उडाले

टाकळी, पंचशीलनगरला पत्रे उडाले

टाकळी : वादळीवार्‍यासह झालेल्या जोरदार पावसामुळे टाकळीसह पंचशीलनगर, राहुलनगर तसेच समतानगर येथील झोपडप˜ीतील घरांचे पत्रे उडाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले. घरातील साहित्याचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. परिसरात ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली, तर जोरदार पावसामुळे रस्त्यांवर ठिकठिकाणी झाडांच्या फांद्या पडल्याचे चित्र होते.
दुपारच्या सुमारास झालेल्या वादळवार्‍यामुळे उपनगर, खोडदेनगर, समतानगर, राहुलनगर, पंचशीलनगर तसेच टाकळी परिसरातील अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले. जोरदार वार्‍यामुळे अनेकांच्या घराचे पत्र उडाले. त्यामुळे त्यांना इतरांच्या घराचा आसरा घ्यावा लागला. रस्त्यावरून पाण्याचे पाट वाहत होते. या पाण्यामध्ये अनेक वाहने अर्धेअधिक बुडाली होती. पाऊस थांबल्यानंतर पडलेली झाडे तोडण्यासाठी झोपडप˜ीतील अनेक लोक तुटून पडले होते. तसेच लहान मुले तुटलेल्या झाडांच्या फांद्या ओढून नेत होते. टाकळीमधील झोपडप˜ी परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले, तर बोधलेनगर चौकातही पाण्याचे डबके तयार झाले होते. त्यामुळे वाहनधारकांना ड्रीमसिटी मार्ग आणि शंकरनगरमार्गे मार्गक्रमण करावे लागले.
रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेले जाहिरात फलक तुटून पडले, तर काही ठिकाणचे छोटे फलक उडून दूरवर पडले. काही फलक विद्युततारांवर पडल्याने विद्युतपुरवठा खंडित झाला. काठे गल्लीतील त्रिकोणी पार्क तसेच सोनजेनगर येथे काही ठिकाणी झाडे तसेच वायर तुटून पडल्याने नागरिकांचे हाल झाले.
फोटो येणार आहे.

Web Title: Letters to Takali, Panchsheel were shattered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.