शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
2
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
3
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
4
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
5
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
6
२४ वर्षे जुन्या खटल्यात मेधा पाटकर दोषी
7
विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान
8
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
9
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
10
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
11
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
12
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल
13
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
14
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
15
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
16
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
17
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
18
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
19
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
20
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर

पालखेडच्या आवर्तनासाठी भुजबळांचे पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 12:35 AM

नाशिक : येवला, निफाड तालुक्यासह मनमाड शहराला पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असून, पालखेड धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी लवकरात लवकर आवर्तन सोडण्यात यावे, अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

ठळक मुद्दे छगन भुजबळ यांनी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्याकडे पत्राद्वारे मागणी पालखेड डाव्या कालव्यातून लवकरात लवकर आवर्तन सोडण्यात यावे

नाशिक : येवला, निफाड तालुक्यासह मनमाड शहराला पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असून, पालखेड धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी लवकरात लवकर आवर्तन सोडण्यात यावे, अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.यासंदर्भात छगन भुजबळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, येवला शहर, तालुक्यातील ३८ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना तसेच मनमाड शहराला पाणीपुरवठा करणाºया जलाशयांमधील पाणीसाठा संपत आल्यामुळे येवला शहारासोबतच ३८ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेवर अवलंबून असलेली गावे तसेच मनमाड शहरात पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. जवळपास आठवडाभर पुरेल एवढा पाणीसाठा या जलाशयांमध्ये शिल्लक आहे. पालखेड धरणसमूहामध्ये येवला, मनमाड व निफाड येथील बिगरसिंचन योजनांसाठी पाणी आरक्षित असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे.येवला व मनमाड शहराला पाणीपुरवठा करणाºया जलाशयांसोबतच येवला व निफाड तालुक्यातील प्रासंगिक आरक्षण असलेले बंधारे भरून दिल्यास अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. त्यामुळे येवला, मनमाड शहर तसेच येवला व निफाड तालुक्यातील पाणीप्रश्न लक्षात घेऊन पालखेड डाव्या कालव्यातून लवकरात लवकर आवर्तन सोडण्यात यावे, अशी मागणी छगन भुजबळ यांनी जिल्हाधिकाºयांना दिलेल्या पत्रात केली आहे.