चला करूया गोपाळकाला...दहीहंडी

By Admin | Updated: August 27, 2016 22:15 IST2016-08-27T22:14:54+5:302016-08-27T22:15:50+5:30

उत्सव : शाळांमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम

Let's see Gopalakala ... DahiHindi | चला करूया गोपाळकाला...दहीहंडी

चला करूया गोपाळकाला...दहीहंडी

नटखट मित्रमंडळ
घोटी : नटखट मित्रमंडळ आयोजित दहीहंडी उत्सव जैन मंदिर चौक येथे मोठ्या उत्साहात पार पडला. गत २१ वर्षांपासून इगतपुरी तालुक्यात सर्वात मानाच्या मोठ्या दहीहंडीचे आयोजन नटखट मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय मिलिंद वालतुले यांनी सुरू केले होते. तीच दहीहंडीची परंपरा पुढे अखंड राखत मोठ्या उत्साहात पार पडली.
नटखट मित्रमंडळ आयोजित २१ हजार रुपयांची दहीहंडी गजानन मित्र मंडळाने फोडली असून याप्रसंगी जनसेवा पतसंस्थेचे सर्व संचालक व नटखट मित्रमंडळाचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी जनसेवा पतसंस्थेचे चेअरमन विठ्ठल काळे, व्हाइस चेअरमन ललीत पिचा, मंगेश काळे, पारस राखेचा, तुषार बोथरा, पिंटू बेदमुथा, ज्ञानेश्वर बुधवारे, अभय बोथरा, वीरेंद्र बेदमुथा, राजाराम घाणे, संतोष सोनार, सूरज शहा, दिलीप लद्दड आदि उपस्थित होते. याप्रसंगी सूत्रसंचालन सचिन खिवंसरा यांनी केले. घोटी येथील नटखट मित्रमंडळाने दहीहंडी बक्षिसाची रक्कम १२१ रुपयांपासून २१ व्या वर्षी २१ हजारांची केली. दरवर्षी यात वाढ होत असून यापर्षी ही मानाची दहीहंडी गजानन मित्रमंडळाने फोडली. याप्रसंगी चित्तथरारक मनोऱ्यांचे प्रात्यक्षिक गोविंदा पथकांनी दाखविले.
निफाड परिसर
निफाड : शहर व ग्रामीण परिसरात विविध शाळा, संस्था आणि मंडळांनी पारंपरिक पद्धतीने गोपाळ- काल्यानिमित्त दहीहंडी जल्लोषात साजरी केली. यावेळी गोविंदारे गोपालासह अन्य कृष्ण गीतांवर अनेकांनी फेर धरला. निफाड येथील वैनतेय इंग्लिश मीडियम स्कूल येथे चिमुकल्यांनी गोपालकाला उत्साहात साजरा केला. चिमुकल्यांनी दहीहंडी फोडून श्रीकृष्णाचा जल्लोष केला व गोविंदा आला रे आला, श्रीकृष्णाच्या गाण्यांवर चिमुकल्यांनी सामूहिक नृत्य केले. याप्रसंगी न्या. रानडे विद्या प्रसारक मंडळाचे कार्यकारी विश्वस्त प्रल्हाद पाटील कराड, विश्वस्त दिलीप वाघवकर, वैनतेय विद्यालयाचे प्राचार्य के. के. निकम, वैनतेय इंग्लिश मीडियम स्कूलच्या पर्यवेक्षक सानप यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. शहरातील जि.प. शाळा नं. एकमध्ये विद्यार्थ्यांनी राधाकृष्णाचा वेश परिधान करत गरबासह टिपरी नृत्य सादर करत दहीहंडी फोडली. यावेळी मुख्याध्यापक नीलेश शिंदे, केंद्रप्रमुख सोमनाथ चित्ते, अविनाश शिंदे, विजय डेर्ले, सुजित गायधनी, श्याम पाटील, मनीषा रायजादे, वनीता गोसावी, अनिता कारले, ललीता शिंदे, बबिता जाधव, धनश्री वाघ तसेच शिक्षक उपस्थित होते. कोठुरे शाळेत गोपालकाल्यानिमित्त दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी शिक्षक मधुकर झेंडे यांनी विद्यार्थ्यांना श्रीकृष्ण लीलेबाबत माहिती दिली. यावेळी मुख्याध्यापक प्रकाश कोकाटे, धर्मेंद्र सोनवणे, मधुकर खुळे, ज्योती ताडगे, राजाभाऊ कदम, नंदकुमार सूर्यवंशी, कल्पना गोसावीसह विद्यार्थी, पालक उपस्थित होते. गोळेगाव येथे नव्याने सुरू झालेल्या बाबूराव तुकाराम ठुबे बहुउदेशीय संस्था संचलित लिटील फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कूल येथे कृष्ण जन्माष्टमीनिमित्त दहीहंडी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी राधाकृष्णाची वेशभूषा परिधान केली होती. यानिमित्त विद्यार्थ्यांनी गौळण सादर केली. (लोकमत चमू)

Web Title: Let's see Gopalakala ... DahiHindi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.