समाज कार्याला कृतीची जोड द्यावी
By Admin | Updated: July 28, 2016 01:10 IST2016-07-28T01:06:55+5:302016-07-28T01:10:48+5:30
नेहा खरे : रोटरी इंटरॅक्ट क्लबचा पदग्रहण सोहळा

समाज कार्याला कृतीची जोड द्यावी
नाशिक : रोटरी क्लब अंतर्गत सामाजिक काम करताना चांगल्या कृतीची जोड देणेसुद्धा आवश्यक असल्याचे मत नेहा खरे यांनी रोटरी क्लब आॅफ नाशिक यांच्यातर्फे आयोजित ‘इंटरॅक्ट क्लब’च्या पदग्रहण सोहळ्याप्रसंगी व्यक्त केले. प. सा. नाट्यगृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या नेहा खरे यांनी मार्गदर्शन करताना सगळ्यांनी एकत्र येऊन काम करायला हवे, असे आवाहन केले. सामाजिक कामाचे दायित्व निभावताना आपल्या स्वत:मध्ये असलेल्या ‘मी पणा’ला विकसित करणेदेखील तितकेच महत्त्वाचे असल्याचे खरे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष अनिल सुकेणकर यांनी माहिती देताना विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच संघ भावना निर्माण व्हावी, तसेच अडीअडचणी सोडविण्याच्या दृष्टीने शिकवण मिळावी, हा क्लबचा उद्देश असल्याचे यावेळी सांगितले. याप्रसंगी वैशाली चौधरी, शिशुविहार शाळेच्या मुख्याध्यापक डॉ. सुरेखा कुलकर्णी, डॉ. धनश्री हरदास यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी समीर जामखेडकर, दीपक सोनार, आर्किटेक्ट विवेक जायखेडकर, उदय पटवर्धन, अश्विन अलई, विक्रम बालाजीवाले, योगेश निकुंभ, ओमप्रकाश रावत यासह रोटरी सदस्य उपस्थित होते. (प्रतिनिधी)