अवैध धंद्यांचा एकजुटीने बीमोड करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:43 IST2021-01-08T04:43:54+5:302021-01-08T04:43:54+5:30

--इन्फो-- तीन महिन्यांत संघटित गुन्हेगारी संपविणार शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील सराईत गुन्हेगारांच्या टोळ्यांचा शोध घेतला जात आहे. सर्व ...

Let's bemoan illegal trades in unison | अवैध धंद्यांचा एकजुटीने बीमोड करू

अवैध धंद्यांचा एकजुटीने बीमोड करू

--इन्फो--

तीन महिन्यांत संघटित गुन्हेगारी संपविणार

शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील सराईत गुन्हेगारांच्या टोळ्यांचा शोध घेतला जात आहे. सर्व गुन्हेगारांची ‘ब्ल्यू प्रिंट’ पोलिसांकडे तयार आहे. यामुळे यापुढे शहरात कोठेही गुन्हेगारांची टोळी सक्रिय दिसून येणार नाही. येत्या तीन महिन्यांत नाशिक शहरातील १३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून संघटित गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करण्याचा ‘टास्क’ शहर पोलीस दलाचे सर्व उपायुक्त, सहायक आयुक्तांसह वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी एकत्रित हाती घेतला आहे, असे पाण्डेय म्हणाले.

--इन्फो--

राजकीय आश्रयदातेही ‘रडार’वर

संघटित गुन्हेगारीला पोसणारे आश्रयदातेदेखील पोलिसांच्या रडारवर असून, त्यांच्याविरुद्धही सबळ पुरावे हाती आल्यास ठोस कारवाई केली जाईल, असे आश्वासन पाण्डेय यांनी दिले. गुन्हेगारांच्या टोळ्या ‘हॅण्डल’ करणारे, आश्रय देणारे राजकीय व्यक्ती असो किंवा शासकीय व्यक्ती असो कोणाचीही गय केली जाणार नाही, पोलीस तपासात ज्याच्याविरुद्ध पुरावे हाती येतील त्याच्याविरुद्ध कारवाई निश्चितपणे होणार, असे पाण्डेय यांनी रोखठोकपणे सांगितले.

---

फोटो आर वर ०५दीपक पाण्डेय नावाने आहे.

Web Title: Let's bemoan illegal trades in unison