होऊ द्या खर्च, काढा कर्ज!पालिकेची तयारी : आणखी दोनशे कोटींचे ऋण

By Admin | Updated: August 3, 2014 01:59 IST2014-08-03T01:16:19+5:302014-08-03T01:59:29+5:30

होऊ द्या खर्च, काढा कर्ज!पालिकेची तयारी : आणखी दोनशे कोटींचे ऋण

Let the expense, drawback debt! | होऊ द्या खर्च, काढा कर्ज!पालिकेची तयारी : आणखी दोनशे कोटींचे ऋण

होऊ द्या खर्च, काढा कर्ज!पालिकेची तयारी : आणखी दोनशे कोटींचे ऋण

 

नाशिक : आर्थिक ओढाताणीमुळे महापालिकेला कुंभमेळ्याची कामे कशी करावी असा प्रश्न सतावत असून, त्यामुळे कर्ज उभारणी करण्यात येत आहे. राज्य शासनाने यापूर्वी दिलेल्या परवानगीनुसार महापालिकेने ३५० कोटी रुपयांपैकी २०० कोटी रुपयांचे कर्ज काढण्याची तयारी केली आहे. इतकेच नव्हे तर भूसंपादनापोटी कोट्यवधी रुपयांची देणी द्यावी लागत असल्याने त्यासाठीही ५० कोटी रुपये म्हणजेच एकूण २०० कोटी रुपयांचे कर्ज काढण्याच्या प्रक्रियेस प्रारंभ केला आहे.
जादा कामांचे दायित्व आणि कुंभमेळा त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून महापालिका कर्ज काढण्याच्या प्रयत्नात होती. गेल्यावर्षी महापालिकेला एकूण ३५० कोटी रुपयांचे कर्ज काढण्यास मान्यता देण्यात आली. त्यात पहिल्या टप्प्यात २०० कोटी रुपये काढताना राज्य शासनाने ९० कोटी रुपये म्हाडाकडून, तर ११० कोटी रुपये वित्तीय संस्थेकडून घेण्याचे सूचित केले होते त्यानुसार महापालिकेने ११० कोटी रुपये महाराष्ट्र बॅँकेकडून घेण्याची तयारी केली असून, अंतिम प्रस्ताव सोमवारी (दि.४) राज्य शासनाच्या मान्यतेसाठी पाठविण्यात येणार आहे. आणखी १५० कोटी रुपयांचे कर्ज महापालिका काढण्यासाठी आत्ता सज्ज झाली आहे. क्रिसील या संस्थेने महापालिकेचे पतमापन करताना जास्तीत जास्त ४०० कोटी रुपये काढण्याची मुभा दिली आहे. त्यातील ३५० कोटी रुपयांचे कर्ज काढतानाच आता भूसंपादनासाठीही ५० कोटी रुपयांचे कर्ज काढण्यात येणार आहे.
कुंभमेळ्यात लागणाऱ्या विविध जागांच्या भूसंपादनासाठी कृती आराखड्यात २०० कोटी रुपयांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. परंतु राज्य शासनाकडून १०५२ कोटी रुपयांच्या आराखड्यात ९०० कोटी रुपये अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र २२२ कोटी रुपये मिळाले आहे. त्या पलीकडे रक्कम देण्याची विनंती महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे, परंतु ही रक्कम न मिळाल्यास शासनावर सर्व जबाबदारी सोपविण्याची तयारी पालिकेने सुरू केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Let the expense, drawback debt!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.