शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांनी गिरविले योगासनाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 00:45 IST

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शहर पोलीस आयुक्तालयात योग दिवस साजरा करण्यात आला. यात ४०० अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभागी होत विविध प्रकारची योगासने करून योगाभ्यास केला.

नाशिक : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शहर पोलीस आयुक्तालयात योग दिवस साजरा करण्यात आला. यात ४०० अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभागी होत विविध प्रकारची योगासने करून योगाभ्यास केला.पोलीस मुख्यालयातील बॅरेक क्रमांक १४ येथे शुक्रवारी (दि.२१) सकाळी ६.३० वाजता आत्मियता योगा व हेल्थ सेंटर यांच्यातर्फे या योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी-कर्मचाऱ्यांनी योगाभ्यास करताना विविध योगासनांचे धडे गिरविले. प्रारंभी प्रार्थना त्यानंतर वृक्षासन, ताडासन, त्रिकोणासन, पर्वतासन, शवासन, हलासन असे उभे आसन प्रकार तसेच भद्र्रासन, शशांकासन, वक्रासन असे बैठे आसन प्रकारांसोबतच कपालभाती, प्राणायाम, शांतीपाठ अशी योगसाधना यावेळी करण्यात आली. दरम्यान, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, पोलिसांचे जीवन धावपळीचे तसेच सातत्याने तणावपूर्ण असते. कोणत्याही क्षणी, रात्री अपरात्री सज्ज रहावे लागते. याचा परिणाम प्रत्येकाच्या वैयक्तिक जीवनावर तसेच कुटुंबीयांवरही होत असतो. अशा परिस्थितीत  आपले शारीरिक व मानसिक  आरोग्य जपण्यासाठी योगसाधना आवश्यक असल्याचे त्यांनी  सांगितले. याप्रसंगी पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, पौर्णिमा चौघुले, अमोल तांबे, माधुरी कांगणे, सर्व सहायक आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक व इतर सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.सीआयआय उत्तर महाराष्ट्र परिषदसीआयआय उत्तर महाराष्ट्र परिषद आणि निरामय साधना फाउंडेशनच्या यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. योगशिक्षक राहुल भंडारी यांनी योगाभ्यास घेतला. प्रमुख पाहुणे म्हणून तुषार उद्योग समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तुषार पटवर्धन उपस्थित होते. योग हा स्वस्थ आणि टिकाऊ जीवनशैलीला प्रोत्साहन देण्यासाठी सर्वोत्तम उपलब्ध उपाय आहे. योगाच्या मदतीने दीर्घ जीवनशैलीचा आनंद घेता येतो, असे पटवर्धन यांनी सांगितले. सीआयआय उत्तर महाराष्ट्र विभागीय परिषदेचे अध्यक्ष गणेश कोठावदे यांनी प्रास्तविक केले.साधना फाउंडेशनचे अध्यक्ष जे. पी. जाधव यांनी स्वागत केले. सीआयआय उत्तर महाराष्ट्र विभागीय परिषदेचे उपाध्यक्ष दीपक कुलकर्णी, गोरक्षनाथ नवले यांनीही मार्गदर्शन केले. विविध आस्थापनातील अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयYogaयोग