शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये भूलतज्ज्ञांनी प्रात्याक्षिकांद्वारे दिले ‘जीवन संजीवनी’चे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 21:26 IST

रोटरी क्लब आॅफ नाशिकच्या वतीने ‘जीवन संजिवनी’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी इंडियन सोसायटी आॅफ अ‍ॅनेस्थेसिओलॉजिस्ट संघटनेच्या नाशिक शाखेच्या डॉ. अनिता नेहेते, डॉ. भावना गायकवाड, डॉ. जयश्री साळी, डॉ. सुनीता संकलेचा या प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या.

ठळक मुद्दे तत्काळ १०८ या संपर्क साधून रुग्णवाहिका बोलवावी. श्वासोच्छवास पोट व छातीवर नजर टाकून तपासावा. रुग्णाचे कपडे सैल करुन हनुवटी वर उचलून डोके मागील बाजूस वाकवावेरुग्णाच्या छातीचे हाड किमान पाच सेंमीपर्यंत खाली दाबण्याचा प्रयत्न करावा.

नाशिक : अचानकपणे उद्भवणाºया अपात्कालिन स्थितीत किंवा अपघातसमयी अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी सर्वसामान्यांनी न घाबरता पुढे येणे आवश्यक आहे. अशावेळी रुग्णवाहिक ा अथवा वैद्यकिय मदत पोहचेपर्यंत अत्यवस्थ व्यक्तीचा बंद पडणारा श्वासोच्छवास जीवन संजिवनी शास्त्रोक्त क्रियेद्वारे सर्वसामान्य व्यक्तीही सुरू ठेवून जीवन संजिवनी देऊ शकतो, असा सूर तज्ज्ञांच्या परिसंवादातून उमटला.रोटरी क्लब आॅफ नाशिकच्या वतीने ‘जीवन संजिवनी’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी इंडियन सोसायटी आॅफ अ‍ॅनेस्थेसिओलॉजिस्ट संघटनेच्या नाशिक शाखेच्या डॉ. अनिता नेहेते, डॉ. भावना गायकवाड, डॉ. जयश्री साळी, डॉ. सुनीता संकलेचा या प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या. प्रमुख पाहूणे म्हणून रोटरीचे अध्यक्ष दिलिपसिंह बेनिवाल, माजी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी सतीशा मंडोरा उपस्थित होते. यावेळी जीवन संजीवनी प्रात्याक्षिकाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न उपस्थित तज्ज्ञांनी केला.

यावेळी अपात्कालिन परिस्थितीत अत्यवस्थ व्यक्तीस प्रथमत: उठविण्याचा प्रयत्न करावा तसेच इतरांना मदतीसाठी बोलवावे. व्यक्ती बेशुध्द असेल तर तत्काळ १०८ या संपर्क साधून रुग्णवाहिका बोलवावी. तोपर्यंत जीवन संजीवनीच्या शास्त्रीय पध्दतीचा अवलंब न घाबरता करावा.

 

घटनास्थळावरील बघ्यांची गर्दी दूर करुन श्वासोच्छवास पोट व छातीवर नजर टाकून तपासावा. रुग्णाचे कपडे सैल करुन हनुवटी वर उचलून डोके मागील बाजूस वाकवावे. त्यानंतर डाव्या हाताचा तळवा छातीच्या मध्यभागी ठेवून उजव्या हाताने त्यावर दाब देण्याचा प्रयत्न सुरू करावा, यावेळी बोटे एकमेकांत गुंतवून ठेवावी. रुग्णाच्या छातीचे हाड किमान पाच सेंमीपर्यंत खाली दाबण्याचा प्रयत्न करावा. मिनिटाभरात किमान शंभर वेळा दाबण्याचा प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे यावेळी नेहेते यांनी सांगितले. साळी, संकलेचा, गायकवाड यांनी प्रत्यक्षरित्या सदर संजीवनीक्रियेचे प्रात्याक्षिक सादर केले.

अशी घ्यावी दक्षताजोपर्यंत रुग्णवाहिका पोहचत नाही व वैद्यकिय प्रथमोपचार रुग्णास लाभत नाही, तोपर्यंत जीवन संजीवनीक्रिया सुरू ठेवावी. दरम्यान,कृत्रिम श्वास देण्यास टाळाटाळ करु नये. श्वास व हृदयाचे ठोके सुरू असतील तर रुग्णाची मान एका बाजूला वळवून ठेवावी, जेणेकरुन उलटी झाल्यास त्याचा त्रास होणार नाही. अपघातामध्ये जर डोके, मानेला गंभीर इजा पोहचली असेल तर मान अजिबात हलणार नाही, याची दक्षता घ्यावी, त्यामुळे तो प्रयत्न टाळावा, असा सुचक सल्लाही यावेळी भुलतज्ज्ञांकडून देण्यात आला.

टॅग्स :NashikनाशिकHealthआरोग्यAccidentअपघात