तरुणांनी गिरविले ‘ट्रॅफिक चिल्ड्रेन पार्क’मध्ये धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 00:31 IST2017-08-02T00:31:48+5:302017-08-02T00:31:48+5:30

शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी पोलिसांकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. वाहतुकीच्या नियमांचे सर्वाधिक उल्लंघन तरुणाईकडून केले जाते.

Lessons Learned in 'Traffic Children Park' Driven by Youth | तरुणांनी गिरविले ‘ट्रॅफिक चिल्ड्रेन पार्क’मध्ये धडे

तरुणांनी गिरविले ‘ट्रॅफिक चिल्ड्रेन पार्क’मध्ये धडे

नाशिक : शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी पोलिसांकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. वाहतुकीच्या नियमांचे सर्वाधिक उल्लंघन तरुणाईकडून केले जाते. यामुळे बिटको व्यवस्थापन महाविद्यालयातील तरुणांनी शहरातील ‘ट्रॅफिक एज्युकेशन चिल्ड्रेन पार्क’मध्ये जाऊन सुरक्षित वाहतुकीचे नियम समजावून घेत धडे गिरविले.
रस्ते अपघाताचे प्रमाण कमी व्हावे, शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी आणि तरुणाईला वाहतुकीच्या नियमांचे महत्त्व समजावे, या उद्देशाने बिटको महाविद्यालयातील एमबीए अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांनी तिडके कॉलनीमधील ‘ट्रॅफिक चिल्ड्रेन एज्युकेशन पार्क’ला भेट दिली. यावेळी ‘सुरक्षित वाहतूक काळाची गरज’ या विषयावर प्रबोधन करणारी चित्रफीत दाखविण्यात आली. त्याचप्रमाणे येथील पार्कमध्ये वाहतुकीच्या विविध नियमांची प्रत्यक्ष पाहणी करत त्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले. सांकेतिक चिन्हे, त्यांचा अर्थ त्यामागील उद्देश याविषयी माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. सुमारे ४० ते ५० विद्यार्थ्यांनी यावेळी सहभाग घेतला होता.

Web Title: Lessons Learned in 'Traffic Children Park' Driven by Youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.