ट्रकचालकांना वाहतूक नियमांचे दिले धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 00:57 IST2018-05-15T00:57:03+5:302018-05-15T00:57:03+5:30
शहरातील आडगावस्थित ट्रक टर्मिनलमध्ये वाहतूक सुरक्षा अभियांनातर्गत नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशन आणि परिवहन विभागाच्या माध्यमातून मालट्रकचालकांना वाहतूक नियमांचे धडे देण्यात आले.

ट्रकचालकांना वाहतूक नियमांचे दिले धडे
नाशिक : शहरातील आडगावस्थित ट्रक टर्मिनलमध्ये वाहतूक सुरक्षा अभियांनातर्गत नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशन आणि परिवहन विभागाच्या माध्यमातून मालट्रकचालकांना वाहतूक नियमांचे धडे देण्यात आले. यावेळी वाहतूक नियमांच्या पोस्टरचे अनावरण करून परिवहन विभागाचे उपप्रादेशिक अधिकारी विनय आहिरे यांनी ट्रकचालकांना अपघात टाळण्यासाठी वाहतूक नियमांची माहिती देऊन नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. यावेळी बोलताना उपप्रादेशिक अधिकारी विनय आहिरे म्हणाले की, दिवसेंदिवस रस्ते अपघाताचे प्रमाण वाढत असून, त्याला आळा घालण्याची गरज आहे. यासाठी ट्रकचालकांची भूमिका ही महत्त्वाची असून, अपघात टाळण्यासाठी ट्रकचालकांनी नियमांचे काटेकोर पालन करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच प्रवास करत असताना चालकांनी हॉर्नचा वापर कमी करून ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी मदत करावी, असे आवाहनदेखील त्यांनी केले. तसेच परिवहन विभागाकडून वाहतूक नियमांच्या पुस्तिकांचे वाटपदेखील करण्यात आले. यावेळी नाशिक ट्रान्सस्पोर्टकडून नियमांच्या स्टिकरचे अनावरण करून त्याचे वाटप करण्यात आले. परिवहन विभागाचे निकम, धात्रक, ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष राजेंद्र फड, सेक्रेटरी सुभाष जांगडा, विनोद शर्मा, उपाध्यक्ष शरद बोरसे, महेंद्रसिंग राजपूत, संजय राठी, सुनील अहिरे, अमोल शळके, मनोज उदावंत, बापू ताकटे, लक्ष्मण पाटील, मुन्ना भालेराव आदी उपस्थित होते.