भावी पोलीस अधिकाऱ्यांना धडे

By Admin | Updated: September 22, 2015 23:31 IST2015-09-22T23:30:46+5:302015-09-22T23:31:25+5:30

भावी पोलीस अधिकाऱ्यांना धडे

Lessons to Future Police Officers | भावी पोलीस अधिकाऱ्यांना धडे

भावी पोलीस अधिकाऱ्यांना धडे

पंचवटी : जागतिक सोहळा असलेल्या कुंभमेळ्याच्या हाताळण्याचे कौशल्य जाणून घेण्यासाठी भारतीय पोलीस सेवेतील पावणे दोनशे प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी गुरुवारी नाशिकमध्ये येऊन धडे घेतले तसेच कुंभमेळ्याच्या नियोजनाच्या विविध पैलूंची पाहणी केली.
कोणत्याही निमंत्रणाशिवाय ठरल्या दिवशीच लाखोंच्या संख्येने जमणारे भाविक हे कुंभमेळ्याचे वैशिष्ट आहेच शिवाय गर्दीचे व्यवस्थापन हे फार मोठे आव्हान असते. साधू-महंतांच्या परंपरेचे पालन हे आणखी वेगळेच कौशल्य असते. या पार्श्वभूमीवर हैदराबाद येथील भारतीय पोलीस सेवेचे प्रशिक्षण घेणाऱ्या १७५ पोलीस अधिकाऱ्यांनी नाशिकमध्ये तपोवन येथे दिली. या प्रशिक्षणार्थींनी कुंभमेळ्यासाठी उभारलेल्या बाह्य आणि अंतर्गत वाहनतळांची पाहणी केली. त्यानंतर शाही मिरवणूक जातानाचा मार्ग आणि परतीचा मार्ग तसेच साधुग्रामची पाहणी करून तेथील जागावाटप आणि अन्य व्यवस्थापनाची माहिती घेतली. साधुग्राममध्ये किती आखाडे असतात, आखाड्यांचे प्रमुख महंत, कोणत्या आखाड्यात किती खालसे येतात, याची माहिती त्यांनी घेतली.

Web Title: Lessons to Future Police Officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.