जिल्हा परिषदेच्या शाळेत स्पर्धा परीक्षांचे धडे
By Admin | Updated: April 4, 2017 00:36 IST2017-04-04T00:36:01+5:302017-04-04T00:36:11+5:30
येवला : एकच ध्यास, सर्वांगीण विकास या ध्येयाने प्रेरित होऊन उंदीरवाडी जिल्हा परिषद शाळेने वर्षभर विविध उपक्रम राबविले.

जिल्हा परिषदेच्या शाळेत स्पर्धा परीक्षांचे धडे
येवला : एकच ध्यास, सर्वांगीण विकास या ध्येयाने प्रेरित होऊन उंदीरवाडी जिल्हा परिषद शाळेने वर्षभर विविध उपक्रम राबविले. विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडावी यासाठी शाळेतर्फे स्पर्धा परीक्षांच्या वाटा हा उपक्रम वर्षभर हाती घेण्यात आला होता.
प्राथमिक व माध्यमिकच्या विद्यार्थ्यांना लोक सेवा आयोगच्या स्पर्धा परीक्षांची तोंडओळख व्हावी, अभ्यासक्रम समजावा, परीक्षेचे स्वरूप समजावे यासाठी शाळेतर्फे स्पर्धा परीक्षांच्या वाटा हा उपक्रम हाती घेण्यात आला होता. राज्य व केंद्र आयोगाच्या स्पर्धा परीक्षेचा भाग म्हणून शाळेतील सातवीच्या विद्यार्थ्यांना रोज १० प्रश्न दिले जात होते. आणि त्याची उत्तरे मुलांनी शोधायची असे ठरले. सुनंदा जिल्हाधिकारी होते.. हा पाठ केवळ पुस्तकी न राहता प्रत्यक्ष जिल्हाधिकारी होण्यासाठी कशा प्रकारे तयारी करावी, अशा अनेक प्रश्नांची प्रत्यक्ष उत्तरे मिळण्यासाठी महिला व बालविकास अधिकारीपदी निवड झालेले रणजित कुऱ्हे यांच्या मुलाखतीचे आयोजनही करण्यात आले होते. या उपक्रमात प्रत्यक्ष व्यवहारांशी पाठ्यपुस्तकांची अशी सांगड घालायची याविषयी माहिती देण्यात आली. वर्षाच्या शेवटी दिलेल्या प्रश्नांवर आधारित स्पर्धा परीक्षा घेण्यात आली. यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वाटप करण्यात येणार आहे. (वार्ताहर)