वर्चस्वाच्या झुंजीत बिबट्या ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 00:46 IST2021-03-07T00:45:46+5:302021-03-07T00:46:18+5:30
नाशिक : वर्चस्व राखण्याच्या आपअपासांत झालेल्या झुंजीत एका बिबट्याचा मृत्यु झाल्याची घटना नाशिक तालुक्यातील मौजे पिंपळद नियतक्षेत्र दहेगावमध्ये घडली. दोन बिबट्यांमध्ये आपली हद्द निश्चितीवरुन झुंज होऊन या झुंजीत गंभीररित्या जखमी झाालेल्या एका दहा ते पंधरा महिन्याचा बिबट्याचा मृतदेह वनविभागाला आढळून आला आहे.

हा नर बिबट्या सुमारे तीन ते चार दिवसांपुर्वी मृत्युमुखी पडला असावा, अशी माहिती वनविभागाच्या सुत्रांनी दिली आहे. दरम्यान, बिबट्याचा मृतदेह काही प्रमाणात कुजलेला जरी असला तरी त्याची नखे, मिशांसह अन्य अवयव शाबुत असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे यांनी सांगितले. दरम्यान, यावर्षी बिबट्या मृत्युमुखी पडण्याच्या घटना वाढल्याचे दिसून येत आहे.