करंजी येथे बिबट्याची मादी आढळली मृतावस्थेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 00:06 IST2018-03-11T00:06:52+5:302018-03-11T00:06:52+5:30

निफाड : तालुक्यातील करंजी येथे उसाच्या शेतात दीड वर्ष वयाची बिबट्याची मादी मृतावस्थेत आढळून आली. रानडुकरांच्या हल्ल्यात बिबट्याचा मृत्यू झाला.

The leopard's female was found in Karanjya | करंजी येथे बिबट्याची मादी आढळली मृतावस्थेत

करंजी येथे बिबट्याची मादी आढळली मृतावस्थेत

ठळक मुद्देशेताबाहेर मृत बिबट्या आढळून आलापरिसरात रानडुकरांच्या पावलांच्या खुणा

निफाड : तालुक्यातील करंजी येथे उसाच्या शेतात दीड वर्ष वयाची बिबट्याची मादी मृतावस्थेत आढळून आली. रानडुकरांच्या हल्ल्यात बिबट्याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वनाधिकाºयांनी व्यक्त केला आहे. निफाड तालुक्यातील करंजी येथील मच्छिंद्र नारायण अडसरे हे शेतात वस्ती करून राहतात. अडसरे शनिवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास उसाच्या शेताजवळून जात असताना त्यांना शेताबाहेर मृत बिबट्या आढळून आला. त्यांनी तत्काळ वन विभागाला फोन करून सदर घटना कळवली. येवला वनविभागाचे वनसंरक्षक राजेंद्र कापसे, वनपरीक्षेत्र अधिकारी संजय भंडारी, वनपाल एम. एम. राठोड, आव्हाड, वनरक्षक विजय टेकनर, वनसेवक विजय लोंढे, भैया शेख, रामनाथ भोरकडे, रामचंद्र गंडे, आदींचे पथक तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पथकाने घटनास्थळी माहिती घेतली असता बिबट्या जेथे मृतावस्थेत आढळून आला त्या परिसरात रानडुकरांच्या पावलांच्या खुणा आढळून
आल्या. पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर जाधव यांनी बिबट्याचे शवविच्छेदन केले. त्यानंतर वनपथकाच्या वतीने बिबट्याचे दहन करण्यात आले.

Web Title: The leopard's female was found in Karanjya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ