बिबट्या जेरबंद; जोगलटेंभीत समाधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 22:53 IST2020-05-24T22:53:31+5:302020-05-24T22:53:45+5:30
जोगलटेंभी येथे शनिवारी (दि.२३) रात्री बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. बिबट्या जखमी झाला आहे.

बिबट्या जेरबंद; जोगलटेंभीत समाधान
नायगाव : येथून जवळच असलेल्या जोगलटेंभी येथे शनिवारी (दि.२३) रात्री बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. बिबट्या जखमी झाला आहे.
सिन्नर तालुक्यातील जोगलटेंभी येथील जेजूरकर वस्तीवर शनिवारी दुपारी शेतकरी कचेश्वर जेजूरक यांच्या शेतात पिंजरा लावण्यात आला होता. रात्री दहा वाजेच्या दरम्यान पिंजºयात ठेवलेल्या कोंबड्यांवर ताव मारण्याच्या नादात बिबट्या अडकला.
ही बातमी परिसरात समजताच नागरिकांनी बिबट्याला बघण्यासाठी मोठी गर्दी केली होती. गेल्या काही दिवसांपासून जोगलटेंभी, नायगाव, सोनगिरी आदी परिसरात हा बिबट्या मुक्त संचार करत होता. शनिवारी दुपारी भाऊसाहेब मानाजी कमोद हे शेतात पाणी देण्यासाठी गेले असता त्यांना उसाच्या शेतात बिबट्या दिसला.
रात्रंदिवस परिसरात फिरणाºया बिबट्याने अनेक पाळीव जनावरांची शिकार केली होती. शिकार करताना बिबट्या अनेकदा सीसीटीव्हीत कैदही झाला होता. वन परिमंडल अधिकारी अनिल साळवे, राजाराम उगले, रमेश आवारी यांनी बिबट्याला मोहदरी वन उद्यानात आणले.
गेल्या काही दिवसांपासून जोगलटेंभी परिसरात दहशत निर्माण करणारा बिबट्या शनिवारी रात्री जेरबंद झाला. मुक्त संचार करणाºया बिबट्याने रात्रभर पिंजºयातून डरकाळ्या फोडत परिसरातील शेतकºयांची झोप उडविली होती. सुटका करून घेण्याच्या नादात पिंजºयातील तार व गजामुळे बिबट्याच्या तोंडाला गंभीर जखमा झाल्या आहेत.