शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याची दहशत : सुरक्षेसाठी पळसेच्या ग्रामस्थांनी घरांभोवती केले चक्क ‘फेन्सिंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 14:27 IST

या घटनेनंतर ऊसशेतीच्या जवळ राहणाऱ्या पळसेतील काही कुटुंबांनी चक्क आपल्या घरांभोवती जाळीचे ‘चेनलिंक फेन्सिंग’ करून घेतले आहे.

ठळक मुद्देघरे, गोठे, गुदामे लोखंडी जाळी लावून सुरक्षित भरदिवसा बिबट्याचा संचार

नाशिक :नाशिक तालुक्याच्या पुर्व भागात दारणा नदीच्या काठालगतच्या गावांमध्ये मागील दोन महिन्यांपासून बिबट्यांचा मुक्त संचार सुरू आहे. मागील पंधरवड्यात दोन बिबटे जेरबंद करण्यास वनविभागाला यश आल्याने काही प्रमाणात दारणाकाठावरील भय कमी होण्यास मदत झाली. पळसे गावातसुध्दा एका चिमुकलीवर बिबट्याने थेट अंगणात येऊन हल्ला केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर ऊसशेतीच्या जवळ राहणाऱ्या पळसेतील काही कुटुंबांनी चक्क आपल्या घरांभोवती जाळीचे ‘चेनलिंक फेन्सिंग’ करून घेतले आहे.दारणा नदीच्या काठालगत शेवगेदारणा, पळसे ही गावे जवळजवळ आहे. भगूरजवळील दोनवाडे ते थेट बाभळेश्वरपर्यंत अन् सामनगाव ते कोटमगावपर्यंत बिबट्याने दहशत माजविली. दीड ते दोन महिन्यांत दारणाकाठालगत तीन चिमुकल्यांसह एका वृध्दाला बिबट्याच्या हल्ल्यात जीव गमवावा लागला आहे. तसेच पळसेत समृध्दी कासार तर सामनगावात ओम कडभाने या चिमुकल्यांचे दैव बलवत्तर म्हणून ते बिबट्याच्या जबड्यातून निसटले.पळसे ग्रामपंचायतीपासून काही अंतरावर असलेल्या शेवगेदारणा रस्त्यावरील टेंभी मळ्यातील ऊसशेतीतसुध्दा भरदिवसा बिबट्याचा संचार शेतकऱ्यांना दिसून आला होता. यामुळे या भागात बिबट्याविषयीची कमालीची दहशत पसरली. या भागातील काही कुटुंबियांनी आपली घरे, पशुधनाचे गोठे, धान्यगुदामे लोखंडी, लाकडी जाळी लावून सुरक्षित करून घेतले आहे.

टॅग्स :Nashikनाशिकleopardबिबट्याwildlifeवन्यजीवFarmerशेतकरी