फुलेनगर शिवारात बिबट्याचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:14 IST2021-01-23T04:14:07+5:302021-01-23T04:14:07+5:30
----------------------- उघड्यावर शौचाला बसत असल्याने आरोग्याचा प्रश्न सिन्नर : शहराच्या पूर्व भागातील कानडी मळा ते काळे मळा या भागातून ...

फुलेनगर शिवारात बिबट्याचे दर्शन
-----------------------
उघड्यावर शौचाला बसत असल्याने आरोग्याचा प्रश्न
सिन्नर : शहराच्या पूर्व भागातील कानडी मळा ते काळे मळा या भागातून जाणाऱ्या रस्त्यावर अनेक व्यक्ती उघड्यावर शौचाला बसत असल्याने दुर्गंधीसह नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. या रस्त्याने सकाळी लोक मॉर्निंगवॉकसाठी जात असतात. अशावेळी लहान मुले रस्त्याच्या कडेला तर मैदानावर पुरुष शौचाला बसत असल्याचे चित्र आहे. शौचालयाचा वापर केला जात नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
---------------------
रस्त्याच्या दुरवस्थेने नाराजी
सिन्नर : तालुका औद्योगिक वसाहतीच्या (स्टाईस)कडेला पश्चिमेकडे असलेल्या उपनगरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. या भागात उज्ज्वलनगर, शंकरनगर, गणेशनगर या भागात मुसळगाव शिवारातील नागरिकांचे व औद्योगिक वसाहतील कामगारांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून या रस्त्याची दुरवस्था झाल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली जात आहे.
---------------------