पाळे खुर्द परिसरात शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:10 IST2021-07-22T04:10:33+5:302021-07-22T04:10:33+5:30
गेल्या एक वर्षापासून पाळे खुर्द येथील सांडोस या जीर्णानदीच्या शिवारात दोन बिबट्यांचा वावर असल्याच्या तक्रारी शेतकरी बांधवांनी वारंवार वनविभागाकडे ...

पाळे खुर्द परिसरात शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन
गेल्या एक वर्षापासून पाळे खुर्द येथील सांडोस या जीर्णानदीच्या शिवारात दोन बिबट्यांचा वावर असल्याच्या तक्रारी शेतकरी बांधवांनी वारंवार वनविभागाकडे केल्या होत्या. मात्र, वनविभाग त्याकडे सर्रास दुर्लक्ष करीत होते. मात्र, सकाळी सुनील दादासाहेब पाटील यांच्या घरासमोर बिबट्याचा मुक्त संचार सुरू होता. सकाळी रिमझिम पाऊस झाल्याने घरातील सर्वच सदस्य घरात होते, म्हणून मोठा अनर्थ टळला आहे. यंदा पावसाने दडी मारल्याने पेरण्यांना उशीर झाला आहे. असे असताना बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकरी व शेत मजूर शेतात जाणाऱ्याच्या मनात भीती निर्माण झाली आहे.
----------------------
घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे. शेतकरी सुनील पाटील यांच्या गिरणा नदीकाठच्या उसाच्या शिवारात वनपरिक्षेत्र अधिकारी वसंत पाटील व वनपाल वाय.एस. निकम यांच्या मार्गदर्शनानुसार या भागात तत्काळ पिंजरा लावला आहे.
-सुचिता पाटील, वनरक्षक