पिंपखेड येथे बिबट्या जेरबंद

By Admin | Updated: November 6, 2016 22:59 IST2016-11-06T22:54:06+5:302016-11-06T22:59:51+5:30

पिंपखेड येथे बिबट्या जेरबंद

Leopard at Pomphed | पिंपखेड येथे बिबट्या जेरबंद

पिंपखेड येथे बिबट्या जेरबंद

दिंडोरी : तालुक्यातील पिंपरखेड येथे गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या दर्शनाने नागरिक भयभीत झाले होते. वनविभागाचे अधिकारी मात्र बिबट्याच्या संचाराबाबत विश्वास ठेवत नव्हते. मात्र उमेश जोशी, धनंजय पाटील, माणिक डबाळे, मनोज जोशी, शंकर घडवजे या नागरिकांनी पाठपुरावा करीत व परिसरातील बिबट्याचा वावर व त्याच्या पाऊलखुणा पटवून देत वनविभागाला पिंजरा आणायला भाग पाडले. यावर वनविभागाने जवळच्याच वागळुद येथून पिंजरा आणुन त्यात शेळी
टाकून मंगेश जोशी यांच्या घराच्या पाठीमागे लावला. यात बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:स्वास सोडला. परिसरातील करंजवण शिवारात मागील वर्षी दोन बछड्यांसह बिबट्याला जेरबंद केले होते. पुन्हा बिबट्या सापडल्याने नागरिकांच्या सुरिक्षततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
ह्या परीसरात उसाचे मोठे क्षेत्र असल्याने नागरिकांत पुन्हा भीतीचे वातावरण तयार झाले आहे. यावेळी परिसरातील लोकांनी बिबट्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. (वार्ताहर)

Web Title: Leopard at Pomphed