काथरगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात कोकरू ठार

By Admin | Updated: June 12, 2016 00:54 IST2016-06-12T00:48:43+5:302016-06-12T00:54:28+5:30

निफाड : शेळी जखमी; नागरिक भयभीत

Leopard killed in leopard attack in Kathgaraga | काथरगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात कोकरू ठार

काथरगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात कोकरू ठार

 ंनिफाड : तालुक्यातील काथरगाव येथे शुक्र वारी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक कोकरू ठार, तर एक शेळी जखमी झाल्याची घटना घडली.
काथरगाव येथील अनिल केदार यांच्या शेतात शालिग्राम नामदेव देवगुंडे (रा. नांदूर कोंढार, ता. नांदगाव) व त्यांचे सहकारी मेंढपाळ यांनी शेळ्या मेंढ्यांसाठी पाल टाकला आहे. या सर्वांकडे मिळून जवळजवळ ४०० शेळ्या मेंढ्या आहेत.
शुक्रवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास अचानक बिबट्याने मेंढ्यांवर हल्ला करून एक शेळी पळवून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र शेळ्या -मेंढ्यांनी मोठमोठा आवाज केल्याने बिबट्या आल्याचे देवगुंडे याच्या लक्षात आले. त्यांच्या सहकाऱ्यांनी बिबट्याचा पाठलाग सुरू केला. त्यामुळे बिबट्याने काही अंतरावर शेळीला सोडून पळ काढला. शेळी गंभीर जखमी झाली होती.
सकाळी पालपासून काही अंतरावर एका मेंढीच्या कोकराचा मृतदेह आढळून आला.
रात्रीच्या सुमारास बिबट्याने या मेंढीच्या पिलास ठार केल्याचे निदर्शनास आले. येवला वन विभागास कळविण्यात आल्यानंतर येवला वन विभागाचे वनरक्षक विजय टेकनर, वनसेवक दिलीप अहिरे, व्ही. एस. लोंढे आदींनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व घटनेचा पंचनामा केला. (वार्ताहर)

Web Title: Leopard killed in leopard attack in Kathgaraga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.