शहरं
Join us  
Trending Stories
1
भर उन्हाळ्यात दिल्ली पाण्यात बुडाली; पावसाचा कहर, जागोजागी पाणी तुंबले
2
मान्सूनची घाई, वेळेआधीच केरळ गाठले; राज्यात २ दिवसांत; २००९ नंतर प्रथमच आठवडाभर आधी आगमन
3
भारताची ताकद पाहून पाकिस्तान घाबरला, देशाच्या सुरक्षेसाठी उचललं मोठं पाऊल! म्हणाला "आमचा शेजारी खतरनाक.."
4
२१ व्या वर्षी परमवीर चक्र मिळालेल्या सैनिकाची खरी कहाणी, 'इक्कीस' सिनेमाची घोषणा, बिग बींचा नातू प्रमुख भूमिकेत
5
आजचे राशीभविष्य २५ मे २०२५ : धन- संपत्ति, मान - सन्मानाची प्राप्ती
6
केंद्र अन् राज्यांनी ‘टीम इंडिया’प्रमाणे काम केल्यास काहीही अशक्य नाही; PM मोदी यांचे आवाहन
7
काळजी नको, सगळे सुरळीत होईल; राहुल गांधींचा दिलासा, सीमाभागातील मृतांच्या कुटुंबांचे सांत्वन
8
५ वर्षांत एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य; 'महाराष्ट्राचेही व्हिजन २०४७': CM फडणवीस
9
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही; पण विधिमंडळाच्या नीतिमूल्य समितीची अद्याप प्रतीक्षाच
10
मुंबई, पुणे, नागपूरसह ७ जिल्ह्यांतून ५४ टक्के उत्पन्न; विकासाच्या प्रादेशिक असंतुलनावर बोट
11
हगवणेंकडून पिस्तुले, चांदीची भांडी, कार जप्त; CM फडणवीस, DCM शिंदेंकडून कुटुंबाचे सांत्वन
12
संततधारेने पिकांना मोठा फटका; बळीराजा संकटात, अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता
13
ॲपलला भारतात जायचे असेल तर जावे, पण अमेरिकेत फोनवर कर लागणारच; ट्रम्प यांचा धमकीवजा इशारा
14
कीव्ह शहरावर रशियाचे ड्रोन, क्षेपणास्त्र हल्ले; १५ जखमी, ओबोलोन जिल्ह्याचे सर्वाधिक नुकसान
15
रुग्णासाठी चॅटजीपीटी बनले वकील, बिनतोड युक्तिवादाने मिळवून दिला २ लाखांचा रिफंड
16
पनवेल-सोमटणे, पनवेल-चिखली नवीन कॉर्ड लाइन; राहुरी-शनी शिंगणापूर नव्या रेल्वे मार्गास मान्यता
17
‘फिरत्या पम्पिंग स्टेशन’मुळे पाण्याचा लवकर निचरा; ४ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर, ८ कोटी खर्च
18
‘विरार-अलिबाग’ विलंबाचा दिल्ली एक्स्प्रेसवेला फटका; ठाण्यात होणार अवजड वाहनांमुळे कोंडी
19
PBKS vs DC : दिल्लीकर समीरची मॅच विनिंग फिफ्टी; पंजाबचं टेन्शन वाढलं! Qualifier 1 च्या शर्यतीत नवं ट्विस्ट
20
Vaishnavi Hagawane: वैष्णवीच्या बाळाला एकनाथ शिंदेंनी घेतलं जवळ, आईवडिलांना दिला धीर; काय घडलं?

बिबट्याची दुचाकीला धडक; मध्यरात्रीचा थरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 15:34 IST

शिवम बिबट्याला बघून घाबरला आणि त्याने त्याच्या मुख्य रस्त्यावर येण्यापुर्वीच दुचाकीचा वेग वाढवून तेथून मार्गस्थ होण्याचा प्रयत्न केला; मात्र बिबट्याचे वेगाने धावल्याने तो थेट शिवमच्या दुचाकीला येऊन धडकला.

ठळक मुद्देदुचाकीस्वार गंभीर जखमी सुदैवाने हल्ला न करता बिबट्याने ठोकली धुम

नाशिक : येथील सिंहस्थनगररोडवरील सेंट लॉरेन्स शाळेपासून हाकेच्या अंतरावर मंगळवारी (दि.४) मध्यरात्री सुमारे पाऊण वाजेच्या सुमारास कॉलनी रस्त्यावरुन चालत आलेल्या बिबट्याने मुख्य रस्ता वेगाने ओलांडताना दुचाकीस्वाराला धडक दिली. यामुळे दुचाकीस्वार शिवम दिगंबर गायकवाड (२३) युवक रस्त्यावर फेकला गेला आणि बिबट्यानेही घाबरुन धूम ठोकली. सुदैवाने यावेळी बिबट्याने युवकावर हल्ला केला नाही, अन्यथा अनर्थ घडला असता. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे रात्र गस्तीच्या पथकाने घटनास्थळ गाठत बिबट्याचा माग काढण्याचा प्रयत्न केला असता बिबट्या पांडवलेणी जंगलाच्या दिशेने धावत जात असल्याचे त्यांना दिसले.शिवम हा त्याच्या मित्राची आई पाथर्डीफाटा येथील एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल असल्याने मित्राला भेटण्यासाठी गेला होता. तेथून रात्री आपल्या राहत्या घराकडे परतत असताना रात्री साडेबारा ते पाऊण वाजेच्या सुमारास सिडकोतील सेंट लॉरेन्स हायस्कूलच्या जवळच शिवमला अचानक बिबट्या मुख्य रस्त्यावर कॉलनीच्या जोड रस्त्याने येत असल्याचे दिसले. यावेळी शिवम बिबट्याला बघून घाबरला आणि त्याने त्याच्या मुख्य रस्त्यावर येण्यापुर्वीच दुचाकीचा वेग वाढवून तेथून मार्गस्थ होण्याचा प्रयत्न केला; मात्र बिबट्याचे वेगाने धावल्याने तो थेट शिवमच्या दुचाकीला येऊन धडकला. यामुळे शिवम रस्त्यावर कोसळून गंभीररित्या जखमी झाला. यावेळी सुदैवाने बिबट्या पुन्हा माघारी फिरून शिवमकडे न येता पुढे पळून गेला आणि शिवमचा जीव भांड्यात पडला.---शाळेच्या सीसीटीव्हीत कैदबिबट्या रस्त्यावरुन धावत येत शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावरुन आतमध्ये झेप घेतो आणि कही वेळेत पुन्हा बाहेर पडत असल्याची घटना सेंट लॉरेन्स शाळेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला. घटनेची माहिती मिळताच वनक्षेत्रपाल विवेक भदाणे यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी परिसरात पाहणी करत बिबट्याचा माग काढला. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रीकरण तपासले असता प्रौढ बिबट्या सुमारे चार वर्षे वयाचा असल्याची माहिती भदाणे यांनी दिली. नागरिकांनी अफवा पसरवू नये, आणि अफवांवर विश्वास ठेवून नये, रात्रीच बिबट्या पांडवलेणीच्या राखीव जंगलाच्या दिशेने गेल्याचे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी बघितले आहे.--

टॅग्स :leopardबिबट्याforest departmentवनविभागNashikनाशिकAccidentअपघात