वरखेड्यात बिबट्याचा मुक्त संचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 18:21 IST2018-09-06T18:21:05+5:302018-09-06T18:21:16+5:30
वरखेडा येथे बिबट्याने पुन्हा दर्शन दिल्याने परिसरात दहशत पसरली असून, तत्काळ पिंजरा लावून बिबट्यास जेरबंद करण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे.

वरखेड्यात बिबट्याचा मुक्त संचार
वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील परमोरी, वरखेडा, लखमापूर, पिंपळगाव केतकी, चिंचखेड परिसरात बिबट्याचा मुक्त संचार वाढला आहे. दोन दिवसांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात तीन वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. त्याच रात्री साडेअकराच्या सुमारास वरखेडा येथे बिबट्याने पुन्हा दर्शन दिल्याने परिसरात दहशत पसरली असून, तत्काळ पिंजरा लावून बिबट्यास जेरबंद करण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे.
कादवा कोलवण नदीकाठच्या गावात बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे. पिंजरे लावले असतानाही बिबटे हल्ले करीत असल्याने, शेतकरी वर्ग, शालेय विद्यार्थी धास्तावले आहेत. तालुक्यातील नागरिक सातत्याने बिबट्याच्या बंदोबस्ताची मागणी करत आहे.
यापूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात म्हेळुस्केत श्रीरंग हर्षवर्धन खिरकाडे व लखमापूर येथील विवेक बिंद या बालकाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. तर परमोरी येथील शेतकरी ज्ञानेश्वर दिघे यांचा सार्थकही बिबट्याच्या हल्ल्यात बळी गेला. आणखी किती बालकांचे बळी घेणार? असा संतप्त सवाल नागरिकांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना केला आहे. (06 बिबट्या)