शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

तळवाडे येथे विहिरीत अडकलेल्या बिबट्याला जीवदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2018 14:38 IST

वन विभागाच्या प्रयत्नाने बिबट्याला बाहेर काढण्यात कर्मचाऱ्यांना यश आल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

सायखेडा (नाशिक) - निफाड, सिन्नर तालुक्याच्या सरहद्दीवरील तळवाडे, महाजनपुर या दोन गावांच्या सीमेवर विठ्ल गवते यांच्या विहिरीत बिबटया पडल्याची घटना घडली. वन विभागाच्या प्रयत्नाने बिबट्याला बाहेर काढण्यात कर्मचाऱ्यांना यश आल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

निफाड तालुक्यात महाजनपुर, तळवाडे, भेंडाळी, औरंगपूर, बागलवाडी हा गावं बिबट्याचे माहेरघर बनले असून एका महिन्यात महाजनपुर शिवारात एकाच ठिकाणी चार बिबटे जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले. असे असले तरी आणखी बिबटया असल्याचे अनेक शेतकऱ्यांनी पाहिले होते. दहा दिवसांनंतर तळवाडे आणि महाजनपुर शिवारात बिबटया मध्यरात्रीच्या सुमारास गवते यांच्या विहिरीत पडल्याचे शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले असता सरपंच लता सांगळे यांना कळविले. सांगळे यांनी वन विभागाचे अधिकारी भंडारे यांना याबाबत माहिती दिली. सकाळी 9 वाजेच्या सुमारास कर्मचारी पिंजऱ्यासह  दाखल झाले आणि त्यांना अनेक प्रयत्न करून बिबट्याला सुखरूप बाहेर काढण्यास यश आले. बिबटया बाहेर येताच शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला वन विभागाने बिबटयाला निफाड जवळील रोपवाटिकेत घेऊन गेले. यावेळी वन विभागाचे अधिकारी संजय भंडारे, कर्मचारी टेकनर, शेख यासह महाजनपुरचे सरपंच आशा फड, राजेंद्र सांगळे,शेतकरी नागरिक उपस्थित होते.

ओसाड माळरानाचा शिवार असूनही या ठिकाणी सातत्याने बिबटया येतो. एकाच ठिकाणी चार बिबटे पकडल्याची घटना ताजी असतानाच जवळच असलेल्या विहिरीत बिबटया पडल्याने या परिसरात आणखी किती बिबटे असण्याची शक्यता आहे. बिबटयाला लपण्यासाठी कोणतही अनुकूल वातावरण नसताना बिबटया या परिसरात वारंवार का येतो की पकडलेले बिबटे परत या भागात सोडले जातात.-लता सांगळे, सरपंच, तळवाडे 

टॅग्स :Nashikनाशिकleopardबिबट्या