वाहनाच्या धडकेने बिबट्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2021 01:34 AM2021-10-29T01:34:59+5:302021-10-29T01:37:51+5:30

पांडवलेणी च्या पायथ्याशी असलेल्या पंडित जवाहरलाल नेहरू वनोद्यानपासून अवघ्या काही मीटर अंतरावर महामार्ग ओलांडण्याच्या प्रयत्नात असलेल्या बिबट्याला भरधाव जाणाऱ्या वाहनाने धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या बिबट्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Leopard dies in vehicle crash | वाहनाच्या धडकेने बिबट्याचा मृत्यू

वाहनाच्या धडकेने बिबट्याचा मृत्यू

Next

नाशिक : पांडवलेणी च्या पायथ्याशी असलेल्या पंडित जवाहरलाल नेहरू वनोद्यानपासून अवघ्या काही मीटर अंतरावर महामार्ग ओलांडण्याच्या प्रयत्नात असलेल्या बिबट्याला भरधाव जाणाऱ्या वाहनाने धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या बिबट्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

खतप्रकल्पाजवळ गुरुवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाने बिबट्याला उडविले धडक इतकी भीषण होती की बिबट्या रस्त्याच्या दुभाजका मध्ये फेकला गेला माहिती मिळताच नाशिक पश्चिम विभागाचे पथकासह वन्यजीव प्रेमींनी घटनास्थळी धाव घेतली वनरक्षकांनी बिबट्याला रेस्क्यू करत पिंजऱ्यात जेरबंद केले. त्याला उपचारासाठी वनविभागाच्या रोपवाटिकेत हलविण्यात आले तेथे रात्री उपचार सुरू असतानाच या बिबट्याचा मृत्यू झाला.

Web Title: Leopard dies in vehicle crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.