दिंडोरी तालुक्यातील सावरपाडा परिसरात बिबट्या मृतावस्थेत
By Admin | Updated: January 17, 2017 22:56 IST2017-01-17T22:56:32+5:302017-01-17T22:56:51+5:30
दिंडोरी तालुक्यातील सावरपाडा परिसरात बिबट्या मृतावस्थेत

दिंडोरी तालुक्यातील सावरपाडा परिसरात बिबट्या मृतावस्थेत
दिंडोरी : तालुक्यातील ननाशीजवळील सावरपाडा परिसरात शेताच्या विहिरीत अंदाजे तीन वर्षे वयाची बिबट्याची मादी मृतावस्थेत आढळून आली.सावरपाडा येथील मनोहर शिंगाडे यांच्या विहिरीत बिबट्या पडला असल्याचे स्थानिक शेतकऱ्यांच्या लक्षात आले. या शेतकऱ्यांनी ननाशी वनपरिक्षेत्र कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन विहिरीतील मृत बिबट्याला बाहेर काढले. पंचनामा केल्यानंतर शवविच्छेदनासाठी नाशिकला पाठविण्यात आले. रात्रीच्या वेळी भक्ष्याचा पाठलाग करत असताना विहिरीच्या कठड्याचा धक्का लागून मादी बिबट्या मूर्च्छित होऊन विहिरीत पडली असावी, असा अंदाज वनविभागाच्या सूत्रांनी वर्तवला आहे. दोन दिवसांपासून पाण्यात राहिल्याने बिबट्याचे शव कुजून वर आल्याने हा प्रकार लक्षात आला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. (वार्ताहर)