चाडेगावला बिबट्या जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 00:13 IST2021-04-17T21:14:08+5:302021-04-18T00:13:59+5:30

एकलहरेः तालुक्यातील चाडेगाव येथे शनिवारी पहाटेच्या सुमारास भाऊसाहेब भिकाजी मानकर यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाला आहे.

Leopard confiscated at Chadegaon | चाडेगावला बिबट्या जेरबंद

चाडेगावला बिबट्या जेरबंद

ठळक मुद्देगेल्या काही महिन्यांपासून मौजे चाडेगाव येथे बिबट्याने धुमाकूळ घातला होता.

एकलहरेः तालुक्यातील चाडेगाव येथे शनिवारी पहाटेच्या सुमारास भाऊसाहेब भिकाजी मानकर यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून मौजे चाडेगाव येथे बिबट्याने धुमाकूळ घातला होता. दिवसादेखील बिबट्याचे दर्शन होत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली होती. त्यामुळे वनविभागाकडे तक्रारी करण्यात आल्याने पाच दिवसांपूर्वी मानकर यांच्या शेतात वनविभागाने पिंजरा लावला होता. पाच दिवसांनंतर शनिवारी पहाटे हा बिबट्या भक्षाच्या शोधात पिंजऱ्यात शिरला.
सदरची महिती किशोर रामनाथ सावकार यांनी बिबट पिंजऱ्यात जेरबंद झाल्याची खात्री करून सकाळी ६ वाजेदरम्यान वनविभागास कळविले. त्यानुसार रेस्क्यू टिम, वनरक्षक गोविंद पंढरे, वनमजूर जयंनाथ गोमटे, वाहनचालक शरद अस्वले यांनी जेरबंद बिबट्याला सुरक्षित रेस्क्यू वाहनाने घेऊन गंगापूर रोपवाटिका येथे ठेवले. (फोटो १७ बिबट्या)

Web Title: Leopard confiscated at Chadegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.