बिबट्याचे बछडे आढळले
By Admin | Updated: November 16, 2016 01:11 IST2016-11-16T01:14:52+5:302016-11-16T01:11:15+5:30
बिबट्याचे बछडे आढळले

बिबट्याचे बछडे आढळले
चाडेगाव : हिंगणवेढे येथे बिबट्याच्या मादीचे तीन पिल्ले सापडल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.
सामनगाव, चाडेगाव, हिंगणवेढे आदि परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचे दर्शन होत असल्याने ग्रामस्थ व शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे. हिंगणवेढे गावात एक महिला शेळ्यांना चारण्यासाठी गोदावरी नदीकाठी असलेल्या शेतात गेले असता या ठिकाणी बिबट्याची तीन जिवंत पिल्ले आढळुन आली. संबंधित महिलेने आजुबाजूच्या नागरिकांना व शेतात काम करणाऱ्यांना शेतकरी, मजुरांना सदर बाब सांगताच घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी उसळली होती. त्यानंतर सदर घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली. बिबट्याच्या मादीनेच सदर पिल्ले दिले असल्यामुळे त्या भागात बिबट्याचा वावर असण्याची दाट शक्यता आहे. सध्या परिसरात उसतोड तोडणीचेही काम सुरू आहे. त्यामुळे ऊसाच्या शेतात जास्त करून बिबट्या दडून राहात असल्याने तोडणी कामगार व शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाने त्वरित पिंजरा लावावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)