कुरडगावला महिलेवर बिबट्याचा हल्ला
By Admin | Updated: February 1, 2016 23:33 IST2016-02-01T23:30:11+5:302016-02-01T23:33:12+5:30
कुरडगावला महिलेवर बिबट्याचा हल्ला

कुरडगावला महिलेवर बिबट्याचा हल्ला
निफाड : सोमवारी सायंकाळी ७ च्या सुमारास निफाड तालुक्यातील कुरुडगाव येथे बिबट्याने हल्ला केल्याने मोटारसायकलवरील महिला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
कुरु डगाव येथील साहेबराव बोडके हे आपली पत्नी मीराबाई (४०) यांना घेऊन मोटारसायकलवरून निफाड येथील बाजारात वांगी विक्री करून सायंकाळच्या सुमारास कुरु डगावला परतत असताना बोडके वस्तीच्या अलीकडे उसात लपून बसलेल्या बिबट्याने अचानक बोडके यांच्या मोटारसायकलवर हल्ला केला आणि मागे बसलेल्या मीराबाई यांच्यावर झेप घेतली. यावेळी त्यांच्या पायाला चावा घेतल्याने त्या जबर जखमी झाल्या. हल्ला झाल्याचे लक्षात येताच साहेबराव बोडके यांनी मोटारसायकल वेगाने पळवण्याचा प्रयत्न केला. या धावपळीत मोटारसायकल खाली पडून ते बाजूच्या नालीत पडले. त्यानंतर मागून मोटारसायकलवर येणारे सागर दराडे यांंच्यावरही बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले.
जखमी मीराबाई यांच्यावर निफाड येथील श्री साई हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार करून त्यांना अधिक उपचारासाठी जिल्हा रु ग्णालयात हलविण्यात आले. (वार्ताहर)