शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 00:47 IST

नाशिक तालुक्यातील गिरणारे गावाजवळील रानवस्तीतील नागटेंबी (नाईकवाडीरोड) येथील शेतात आपल्या मुलासोबत दुपारच्या सुमारास शेतात काम करीत असताना अचानक बिबट्याने शेतकऱ्यावर पाठीमागून हल्ला केला.

ठळक मुद्देगिरणारे : शेतकरी गंभीर जखमी; दोन बछड्यांसह बिबट्या पसार

गंगापूर : नाशिक तालुक्यातील गिरणारे गावाजवळील रानवस्तीतील नागटेंबी (नाईकवाडीरोड) येथील शेतात आपल्या मुलासोबत दुपारच्या सुमारास शेतात काम करीत असताना अचानक बिबट्याने शेतकऱ्यावर पाठीमागून हल्ला केला. त्याचदरम्यान आजूबाजूच्या शेतात काम करणाºया शेतकऱ्यांनी धाव घेतल्यामुळे बिबट्याने घाबरून नजीकच्या शेतात पोबारा केला. दरम्यान, जखमी शेतकºयाला प्रथमोपचारासाठी जवळच्या खासगी दवाखान्यात नेऊन नंतर अधिक उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.गिरणारे गावातील शेतकरी दीपक गणपत पिंगळे आपल्या लहान मुलासोबत नाईकवाडी रोडवरील रानवस्तीतील नागटेंबी परिसरातील शेतात काम करीत असताना बिबट्या व त्याची दोन पिल्ले त्याच परिसरात दबा धरून बसलेले होते. अचानक बेसावध असलेल्या व शेती कामात व्यस्त असलेल्या दीपक पिंगळे यांच्यावर बिबट्याने पाठीमागून झडप घेतली व त्यांच्या हात, पाय व पाठीचा लचका तोडण्याचा प्रयत्न केला. त्यावर पिंगळे यांनी आरडाओरड करून बिबट्याशी झुंज देण्याचा प्रयत्न केला. याचदरम्यान पिंगळे यांच्या शेजारच्या शेतात काम करणाºया शेतकºयांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी बिबट्याच्या दिशेने धाव घेतली असता, बिबट्या व त्याच्या दोन बछड्यांनी तेथून धूम ठोकली. दरम्यान, या घटनेची माहिती वाºयासारखी गाव परिसर, मळे परिसरात पसरताच, सर्वांनी पिंगळे यांच्या शेताकडे धाव घेतली. या भागात बिबट्याच्या खुलेआम होणाºया दर्शनाने नाशिक तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील शेतकºयांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, शेतात काम करणे, शाळेत मुलांना सोडण्यास जाणे, शतपावलीसाठी रात्रीचे बाहेर निघणे कठीण झाले आहे. या भागातील बिबट्याला जेरबंद करून नागरिकांच्या मनातील भीती दूर करावी, अशी मागणी परिसरातील शेतकºयांनी केली आहे.काही दिवसांपूर्वीच अशा प्रकारची घटना गंगावºहे परिसरातील सुला वाइन रोडला असलेल्या धोंगडे वस्तीजवळ राजेंद्र फुलसुंगे यांच्या गोठ्यातील गाय, वासरावर बिबट्याने हल्ला करून त्यांना ठार मारले होते. त्यामुळे गिरणारे परिसरासह महादेवपूर, दुगाव, मनोली, मातोरी, मुंगसरा, वाडगाव, नाईकवाडी, मखमलाबाद, जलालपूर, चांदशी, नाशिक डावा कालव्याचे शेतमळे परिसरात बिबट्याच्या दर्शनाने नागरिक भयभीत झाले असून, त्यांना रात्री-अपरात्री घरातून बाहेर निघावे की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.शासन नियमानुसार अर्थसहाय्य मिळणारशेतात काम करीत असताना अचानक बिबट्याने शेतकºयावर पाठीमागून हल्ला केला. त्याचदरम्यान आजूबाजूच्या शेतात काम करणाºया शेतकºयांनी धाव घेतल्यामुळे बिबट्याने घाबरून नजीकच्या शेतात पोबारा केला. दरम्यान, जखमी शेतकºयाला प्रथमोपचारासाठी जवळच्या खासगी दवाखान्यात नेऊन नंतर अधिक उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गिरणारे गावातील शेतकरी दीपक गणपत पिंगळे आपल्या लहान मुलासोबत नाईकवाडी रोडवरील रानवस्तीतील नागटेंबी परिसरातील शेतात काम करीत असताना बिबट्या व त्याची दोन पिल्ले त्याच परिसरात दबा धरून बसलेले होते.

टॅग्स :Nashikनाशिकleopardबिबट्याFarmerशेतकरी