नालशेत येथे शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:13 IST2021-07-17T04:13:05+5:302021-07-17T04:13:05+5:30

सदर शेतकऱ्याला वाचविण्यासाठी गेलेले राजेंद्र रामू पवार (३६,रा. नालशेत) यांच्यावरही बिबट्याने झडप घातली. तेथे जवळच ...

Leopard attack on a farmer at Nalshet | नालशेत येथे शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला

नालशेत येथे शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला

सदर शेतकऱ्याला वाचविण्यासाठी गेलेले राजेंद्र रामू पवार (३६,रा. नालशेत) यांच्यावरही बिबट्याने झडप

घातली. तेथे जवळच काम करत असलेल्या शेतकऱ्यांनी

आरडाओरड केली. त्यामुळे बिबट्याने तेथून धूम ठोकत जंगलाच्या

दिशेने पळ काढला. त्यानंतर ग्रामस्थांनी तत्काळ वनरक्षक एम. जी. दळवी यांच्याशी

संपर्क साधला असता त्यांनी तातडीने वनअधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पाठविले. जखमी सोमनाथ पवार

व राजेंद्र पवार यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय

पेठ येथे आणण्यात आले व त्यांच्यावर औषधोपचार करून त्यांना पुन्हा घरी सोडण्यात आले. वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती सीमा सुरेश मुसळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कार्यवाही सुरू आहे.

फोटो- १६ बिबट्या फार्मर

बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेला शेतकरी.

160721\16nsk_27_16072021_13.jpg

फोटो- १६ बिबट्या फार्मरबिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेला शेतकरी. 

Web Title: Leopard attack on a farmer at Nalshet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.