बिबट्याचा युवतीवर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 00:09 IST2017-09-08T23:43:26+5:302017-09-09T00:09:32+5:30
सिन्नर तालुक्यातील पास्ते शिवारात बिबट्याने युवतीवर हल्ल्याचा प्रयत्न केला; मात्र त्यातून ती थोडक्यात बचावली. सदर घटना गुरूवारी सकाळी घडली. दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून बिबट्याचा या परिसरात धुमाकूळ सुरू असून, त्याला पकडण्यासाठी वनविभागाचे प्रयत्न सुरू आहेत.

बिबट्याचा युवतीवर हल्ला
नायगाव : सिन्नर तालुक्यातील पास्ते शिवारात बिबट्याने युवतीवर हल्ल्याचा प्रयत्न केला; मात्र त्यातून ती थोडक्यात बचावली. सदर घटना गुरूवारी सकाळी घडली. दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून बिबट्याचा या परिसरात धुमाकूळ सुरू असून, त्याला पकडण्यासाठी वनविभागाचे प्रयत्न सुरू आहेत.
सिन्नर तालुक्यातील पास्ते येथील काजीखोरा या शिवारातील घुगे वस्तीवर दुपारी पंढरी सुदाम घुगे यांच्या घराच्या खिडकीत बसलेली त्यांची मुलगी कावेरी (१८) हिच्यावर घराच्या बाहेरील बाजूने बिबट्याने पंजा मारण्याचा प्रयत्न केला. मात्र कावेरीपर्यंत बिबट्याचा पंजा पोहचला नसल्यामुळे ती या हल्ल्यातून थोडक्यात बचावली.