विधान परिषद विशेषाधिकार समितीची नाशकात होणार बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2016 00:02 IST2016-02-07T23:44:49+5:302016-02-08T00:02:10+5:30

विधान परिषद विशेषाधिकार समितीची नाशकात होणार बैठक

Legislative Council Special Committee will be formed in Nashik | विधान परिषद विशेषाधिकार समितीची नाशकात होणार बैठक

विधान परिषद विशेषाधिकार समितीची नाशकात होणार बैठक

नाशिकरोड : विधान परिषद विशेषाधिकार समितीची विभागीय स्तरावरील बैठक १८ फेब्रुवारी रोजी नाशिक येथे होणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी दिली.
विशेषाधिकार समितीमध्ये समिती प्रमुख डॉ. निलम गोऱ्हे यांच्यासह अकरा सदस्यीय समितीमध्ये विधानपरिषद सदस्य विजय उर्फ भाई गिरकर, डॉ. अपूर्व हिरे, राजेंद्र जैन, सतीश चव्हाण, नरेंद्र पाटील, अ‍ॅड. निरंजन डावखरे, अ‍ॅड. राहुल नार्वेकर, शरद रणपिसे, जनार्दन चांदूरकर व विशेष निमंत्रित श्रीकांत देशपांडे यांचा समावेश आहे. नाशिक विभागातील सर्व विधान परिषद व विधानसभा सदस्य, शासकीय विभागांचे प्रमुख यांच्याबरोबर सकाळी साडेदहा ते साडेबारा यावेळेत शासकीय विश्रामगृह येथे विविध विषयांवर दोन स्वतंत्र बैठक होणार आहे.
बैठकीस विभागातील सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कायकारी अधिकारी, पोलीस आयुक्त, मनपा आयुक्त, पोलीस अधीक्षक, विविध शासकीय विभागांचे प्रमुख उपस्थित राहतील. समितीची मुख्य बैठक दुपारी दोन ते पावणे पाच यावेळेत महाराष्ट्र आरोग्य विज्ञात विद्यापीठ येथे होईल.

Web Title: Legislative Council Special Committee will be formed in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.