लैंगिक शोषणातील महिलांना मिळाले कायदेशीर मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 01:32 IST2017-08-06T01:32:02+5:302017-08-06T01:32:39+5:30
लैंगिक शोषण झालेल्या महिला या आरोपी नसून बळी आहेत़ त्यांना कायदेविषयक तरतुदींची माहिती शासकीय योजनांबाबत माहिती असणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन न्यायाधीश एच़ यू.जोशी यांनी केले़ जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व भद्रकाली पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने भद्रकाली पोलीस ठाण्यात शोषित महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात ते बोलत होते़

लैंगिक शोषणातील महिलांना मिळाले कायदेशीर मार्गदर्शन
नाशिक : लैंगिक शोषण झालेल्या महिला या आरोपी नसून बळी आहेत़ त्यांना कायदेविषयक तरतुदींची माहिती शासकीय योजनांबाबत माहिती असणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन न्यायाधीश एच़ यू.जोशी यांनी केले़ जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व भद्रकाली पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने भद्रकाली पोलीस ठाण्यात शोषित महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात ते बोलत होते़
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव एस़ एम़ बुक्के यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे महत्त्व विशद करून प्राधिकरणतर्फे देण्यात येणाºया मदतीबाबत मार्गदर्शन केले़ यावेळी सामाजसेवी संस्थेच्या कार्यकर्त्या आसावरी देशपांडे यांनी महिलांच्या व्यावसायिक लैंगिक शोषणाबाबतचे अनुभव सांगितले़ या कार्यक्रमास भद्रकालीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगलसिंग सूर्यवंशी, पंचवटीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्ढेकर यांच्यासह सुमारे दोनशे शोषित महिला व पोलीस कर्मचारी उपस्थित होते़