शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
2
इराणच्या फोर्डोसह तीन ठिकाणांवर अमेरिकेने हल्ले चढविले, पण या ठिकाणाकडे ढुंकूनही पाहिले नाही...
3
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यामुळे घाबरला पाकिस्तान; शाहबाज शरीफ यांनी बोलावली तातडीची बैठक, मुनीरही उपस्थित राहणार 
4
एकाच प्रियकरासोबत होते नववधू आणि तिच्या आईचे संबंध, अनैतिक संबंधांच्या गुंत्यात गेला पतीचा बळी
5
अनर्थ टळला! टेकऑफ घेण्याआधीच विमानात तांत्रिक बिघाड; पायलटच्या सतर्कतेमुळे १७७ प्रवासी सुरक्षित
6
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; कवीने परत केला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
7
"माझी मुलगी आधी एअर इंडियात पायलट होती...", अहमदाबाद विमान दुर्घटनेवर अलका कुबल म्हणाल्या...
8
'आप'ने पुन्हा पाडलं भाजपाच्या गडाला खिंडार; पोटनिवडणुकीतील दणदणीत विजयाची ५ कारणे काय?
9
३ मुलांच्या आईचं १४ वर्षांचं अफेयर, तिसऱ्याची एन्ट्री झाली अन् पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
10
BEL Stock Price: 'या' नवरत्न स्टॉकनं केलं मालामाल; १ लाख रुपयांचे झाले १ कोटींपेक्षा अधिक, कोणता आहे शेअर?
11
"आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ" परराष्ट्र धोरणावरून काँग्रेसची सरकारवर टीका
12
तत्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये मोठा बदल! १ जुलैपासून आधार लिंक नसेल तर मिळणार नाही तिकीट
13
मराठमोळ्या अभिनेत्याने या कारणामुळे केली आत्महत्या, पोलिसांनी सांगितला घटनाक्रम
14
अमेरिकेच्या बंकर बस्टर बॉम्बची ताकद किती? हा बॉम्ब कुणी बनवला?
15
बाजारात येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना पाहून करत होता अश्लील इशारे;२० वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक
16
Inflation: २० वर्षांनंतर एक कोटींचं मूल्य असेल फक्त २५ लाख; महागाई कशी कमी करतेय तुमच्या पैशांचं मोल?
17
आम्ही ४ वर्षांपासून बोलत नव्हतो! संजय कपूर यांच्या निधनानंतर बहिणीची पोस्ट, म्हणाली- "जे काही घडलं ते भयानक..."
18
काळ आला होता पण..; घरगुती सिलिंडरचा भीषण स्फोट, पाहा अंगावर काटा आणणारा Video
19
'आम्हाला तिथेच लढायचेय' इराण-इस्रायल, अमेरिका युद्धात WWE का इरेला पेटला...
20
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाने कानात मकरकुंडले का धारण केली? मत्स्यावताराशी काही संबंध?

बोगस लाभ घेणाऱ्यांवर होणार कायदेशीर कारवाई

By admin | Updated: June 21, 2014 01:06 IST

सटाणा : बागलाण तालुक्यातील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी त्रिस्तरीय समितीची स्थापना

सटाणा : बागलाण तालुक्यातील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी त्रिस्तरीय समितीची स्थापना करण्यात येऊन प्रत्यक्ष पाहणी व पंचनाम्यानंतरच वंचित असलेल्या शेतकऱ्यांना अनुदान मिळावे यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येतील तसेच ज्या अनुदानित शेतकऱ्यांनी लाभ घेतलेला आहे, त्यांची सखोल चौकशी होऊन खोट्या लाभार्थींची शोधमोहीम राबवून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा निर्णय येथील चिनार या शासकीय विश्रामगृहावर झालेल्या बैठकीत घेण्यात आला. चिनार विश्रामगृहावर बागलाणचे आमदार उमाजी बोरसे, प्रांताधिकारी संजय बागडे, तहसीलदार अश्विनीकुमार पोतदार, तालुका कृषी अधिकारी कापडणीस व तालुका गटविकास अधिकारी कोंदे उपस्थित होते. बागलाण तालुक्यात गत चार महिन्यांत झालेल्या गारपिटीमुळे ५७ हजार शेतकऱ्यांना सुुमारे ६४ कोटी रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे. डांगसौंदाणे, बुंधाटे, वड्याचे पाडे, चाफापाडा, करंजखेडसह अन्य गावांचे चुकीचे पंचनामे झाल्याने अल्प नुकसानभरपाई मिळाली. पिकांच्या नुकसानीप्रमाणे भरपाई मिळावी या मागणीसाठी शेकडो शेतकऱ्यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबिला होता. यामुळे आज झालेल्या बैठकीत मंडल अधिकारी, कृषी विस्तार अधिकारी, तलाठी यांची त्रिस्तरीय समितीची नेमणूक करण्यात आली असून, या परिसरातील शेतावर जाऊन वस्तुस्थिती दर्शक पंचनामे करण्याबरोबरच परिस्थितीजन्य पुरावे गोळा करण्यात येऊन सदरचे पंचनामे शासनाला सादर करण्यात येऊन अनुदानाची मागणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस कैलास बोरसे, गोपाळ बैरागी, संजय ह्याळीज, श्यामकांत बगडाणे, बाबूराव बागुल, तुकाराम चिंचोरे उपस्थित होते.