शौचे स्मृतिदिनानिमित्त व्याख्यान
By Admin | Updated: January 12, 2016 23:15 IST2016-01-12T23:12:34+5:302016-01-12T23:15:28+5:30
शौचे स्मृतिदिनानिमित्त व्याख्यान

शौचे स्मृतिदिनानिमित्त व्याख्यान
नाशिक : रवींद्र विद्या प्रसारक मंडळाचे संस्थापक आचार्य शौचे गुरु जी यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला.
राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आचार्य शौचे गुरुजींनी ५४ वर्षांपूर्वी रवींद्र विद्या प्रसारक मंडळ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. आज संस्थेच्या चार शाळा असून, यात इंग्रजी माध्यमाच्या शाळेचाही समावेश आहे. रवींद्रनाथ विद्यालयात शौचे गुरुजींच्या १५व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. यावेळी संस्थचे अध्यक्ष मनोज पिंगळे, हरी काशीकर, वसंतराव राऊत यांनी शौचे गुरु जींच्या स्मृती जागृत करून त्यांना अभिवादन केले. यावेळी प्रमुख वक्ते पत्रकार सचिन अहिराव होते. त्यांनी शासनाचे शिक्षण विषयक धोरण आणि शिक्षकांची बदलती मानिसकता याविषयी व्याख्यान दिले. यावेळी रवींद्र विद्या प्रसारक मंडळाच्या सचिव वासंतीताई गटणे, संचालक रंजना चौधरी, ज्ञानेश्वर बरकले, सुमती जोशी आणि सर्व शाळांचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हजर होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक दत्तात्रय दानडे व आभार प्रदर्शन मुख्याध्यापक रामदास गायधनी यांनी केले. (प्रतिनिधी)