आरोग्य, शिक्षणावर व्याख्यान उत्साहात
By Admin | Updated: June 27, 2014 00:20 IST2014-06-26T20:35:47+5:302014-06-27T00:20:51+5:30
आरोग्य, शिक्षणावर व्याख्यान उत्साहात

आरोग्य, शिक्षणावर व्याख्यान उत्साहात
सिन्नर : विविध साथीच्या रोगांचा पावसाळ््यात प्रसार होतो. तो रोखण्यासाठी परिसर स्वच्छता महत्वाची आहे. पावसाच्या पाण्याने साचलेली डबकी डासांचे उत्पत्ती स्थान असल्याने अशी डबकी साचू नये म्हणून खबरदारी घेण्याची गरज आहे. विविध साथीचे रोग रोखण्यासाठी आपणच अधिक काळजी घ्यावी असे आवाहन पास्ते आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवक व्ही. के. केदार यांनी केले.
तालुक्यातील सोनांबे येथील मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेच्या जनता विद्यालयात ‘आरोग्य शिक्षण’ या विषयावर व्याख्यान देताना ते बोलत होते. या प्रसंगी मुख्याध्यापक श्रीमती के. एम. मोरे व्यासपीठावर उपस्थित होत्या. केदार यांनी विविध साथीच्या रोगांची माहिती व प्रतिबंधात्मक उपाययोजना सांगितल्या. विद्यार्थ्यांनी स्वत:च्या घराचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करतानाच शेजारच्यांनाही तशी काळजी घेण्याची माहिती द्यावी असे आवाहन त्यांनी केले. डासांमुळे डेंग्यू, हिवताप, चिकणगुणिया आदी रोगांचा फैलाव होतो. पावसाळ््यात डबके साचतात, छपरावरील टायर, प्लास्टीकचे डबे यांच्यामध्ये पाणी साचून राहिल्यावर तेथे डास अंडी घालून डासांची पैसास वाढवितो. (वार्ताहर)
हा डास मानवाला चावल्यास विविध रोंगाची लागन होते. असेही त्यांनी सांगितले. या रोगांची लक्षणे, उपचार व प्रतिबधक उपाययोजना याबाबत सविस्तर माहिती सांगितली. मुख्याध्यापक श्रीमती मोरे यांनी प्रास्ताविक केले. के. बी. ढोली यांनी आभार मानले. या प्रसंगी आर. जी. घुले, कीर्ती जाधव, एस. के. सुडके, बी. बी. उकाडे आदींसह शिक्षक, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. (वार्ताहर)