मानवी हक्क विषयावर व्याख्यान
By Admin | Updated: October 23, 2016 23:36 IST2016-10-23T23:36:24+5:302016-10-23T23:36:56+5:30
दिंडोरी : नाईक शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालय

मानवी हक्क विषयावर व्याख्यान
दिंडोरी : येथील क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयात वाणिज्य शाखेअंतर्गत एम. कॉम. वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी मानवी हक्क या विषयावर राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा.संजय काळे यांचे व्याख्यान संपन्न झाले.
याप्रसंगी व्यासपीठावर वाणिज्य विभागप्रमुख प्रा. डॉ. धीरज झाल्टे, प्रा. वैशाली गांगुर्डे, प्रा. अभय सिनारे, प्रा. संतोष बोरस्ते उपस्थित होते. प्रास्ताविकामधून डॉ. धीरज झाल्टे यांनी व्याख्यान घेण्यामागील भूमिका मांडली.
आपल्या व्याख्यानातून प्रा.काळे यांनी यूनोने मान्य केलेल्या मानवी अधिकारांची तसेच भारतीय राज्य घटनेनेतील मूलभूत हक्क याची सविस्तर माहिती सादर केली. तसेच याप्रसंगी अधिक मार्गदर्शन करताना प्रा. संजय काळे म्हणाले की, देशाची राज्यघटना समाजजीवनाचा पाया आहे. राज्यघटनेने दिलेले अधिकार व कर्तव्य याची जाणीव प्रत्येक व्यक्तिने ठेवली पाहिजे या कार्यक्रमासाठी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार ममता टोंगारे हिने मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वैशाली रोकडे, सुनील उगले यांच्या मार्गदर्शनाखाली धीरज झाल्टे, वैशाली गांगुर्डे, अभय सिनारे, संतोष बोरस्ते ममता टोंगारे, प्रतीक पगारे, चेतन चौधरी, तृषार निकम आदिनी परीश्रम घेतले. (वार्ताहर)